मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याचे दर घटले आहेत. मुख्यतः सकाळी डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत. येत्या गुरुवारी वैयक्तिक वापर खर्च (Personal Consumption Expenditure PCE) चे आकडे व सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ची आकडेवारी येणार आहे.तज्ञांच्या मते हे निकाल अपेक्षेपेक्षा कमी असण्याची शक्यता लक्षात घेता बाजारातील सोन्याचे भाव वधारले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात सकाळपर्यंत ०.३६ टक्क्यांनी घसरण होत २३५२.८० स्तरावर सोने पोहोचले आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.११ टक्क्यांनी घसरण होत २३५३.८० पातळीवर सोने पोहोचले होते. आज भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मधील सोन्याचे निर्देशांक ०.०४ टक्क्यांनी घसरत ७२१५०.०० पातळीवर पोहोचले आहे.
'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २५० रुपयाने वाढत ६७१०० पातळीवर पोहोचले आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २७० रुपयांनी वाढत ७३२०० रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम २५० ते २७० रुपयांनी वाढले आहेत.
चांदीही महागली
देशात चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. 'गुड रिटर्न्स'संकेतस्थळावरील माहितीनुसार, १ किलो चांदीमागे १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईतील चांदीचे दर १२०० रुपये प्रति किलोने वाढले आहेत.