"जितेंद्र आव्हाडांनी फाडले बाबासाहेबांचे पोस्टर!"

    29-May-2024
Total Views | 341

Jitendra Awhad 
 
मुंबई : स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. त्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा थेट इशारा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तसेच त्यांनी आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याला विरोध केला आहे. त्यांनी बुधवारी महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी त्यांनी बाबासाहेबांचा फोटोही फाडल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे.
 
हे वाचलंत का? -  तीन दिवसांत बिनशर्त माफी मागा अन्यथा...; मुख्यमंत्री शिंदेंची राऊतांना कायदेशीर नोटीस
 
अमोल मिटकरी म्हणाले की, "स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत ही फार मोठी चूक आहे. स्टंटबाजी करताना आव्हाडांना हेही लक्षात येऊ नये की, आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडत आहोत. ही चूक अक्षम्य असून देशाने याची गंभीर दखल घेतली आहे."
 
"ज्या आव्हाडांनी बाबासाहेबांची प्रतिमा फाडून राष्ट्राचा अपमान केला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर त्यांनी २४ तासांच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडला बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून प्रायश्चित्त केलं नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हा अपमान एका समाजाचा नाही तर देशाचा अपमान आहे. स्टंटबाजीच्या नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121