IPO Update: उद्यापासून ' हे ' दोन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल जाणून घ्या इत्यंभूत माहिती....

Associated Coaters Limited व Aimtron Electronics Limited या दोन कंपन्यांचा आयपीओ बाजारात दाखल

    29-May-2024
Total Views |

IPO
 
 
 
मुंबई: उद्यापासून गुंतवणूकदारांसाठी बाजारात Associated Coaters Limited व Aimtron Electronics Limited या दोन कंपन्यांचा आयपीओ ३० मे रोजी बाजारात येणार आहे. या दोन्ही आयपीओची माहिती पुढीलप्रमाणे-
 
१) असोसिएटेड कोटर लिमिटेड (Associated Coaters Limited) - या कंपनीचा आयपीओ ३० मे पासून बाजारात दाखल होणार आहे. कंपनीतर्फे ४.२२ लाख शेअर्स बाजारात गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील. हा आयपीओ (IPO) ३० मे ते जून ३ दरम्यान गुंतवणूकीसाठी असेल. ४ जूनपासून बीएसई एसएमई (BSE- SME) प्रवर्गात दाखल होणार आहे. कंपनीने या आयपीओचा प्राईज बँड १२१ रुपये प्रति समभाग निश्चित केला आहे.
 
याशिवाय गुंतवणूकीसाठी १००० समभागांचा गठ्ठा (Lot) उपलब्ध असेल तर कमीतकमी १२१००० रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांना करावी लागणार आहे. Gretex Services Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत तर मार्केट मेकर म्हणून Gretex Share Broking कंपनी म्हणून काम पाहिल.
 
४ जूनला ही कंपनी पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप करणार आहे तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ५ जूनपासून मिळू शकतो. ६ तारखेपासून कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे. या गुंतवणूकीत रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांना आयपीओतील ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर इतर वर्गांना ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. जगजीत सिंह धिलन व नवनीत कौर कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहेत.
 
ही कंपनी २०१७ साली स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी रियल इस्टेट क्षेत्रातील अल्युमिनियम पावडर कोटिंग व तत्सम सुविधा पुरवते. कंपनीचे महसूल ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ३९७ कोटी होते. तर कंपनीचा करोत्तर नफा ३१ मार्च २०२३ तिमाहीतील ५४.३० कोटींच्या तुलनेत ७५.७७ कोटींपर्यंत पोहोचला होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल १६.३७ कोटी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर भांडवली खर्च, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, व इतर खर्चासाठी वापरला जाणार आहे.
 
२) एमट्रोन इलेक्ट्रोनिक लिमिटेड- (Aimtron Electronics Limited) - या कंपनीचा आयपीओ ३० मे ते जून ३ पर्यंत बाजारात गुंतवणूकदारांना उपलब्ध असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,आयपीओ एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे. या आयपीओत एकूण ५४.०५ लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू बाजारात उपलब्ध असेल.कंपनीकडून १५३ ते १६१ रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे.गुंतवणूकीसाठी एक ८०० समभागांचा गठ्ठा (Lot) असणार आहे. गुंतवणूकदारांना आयपीओसाठी कमीत कमी १२८८०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
 
HEM Securities Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Link Intime India Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Hem Finlease कंपनी काम पाहणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप ४ जूनपर्यंत होणार आहे. तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ५ जूनपासून मिळू शकतो.६ जूनपासून कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे.
 
आयपीओमध्ये ५० टक्के वाटा हा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) उपलब्ध असणार आहे तर रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) गुंतवणूकदारांना १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध आहे. मुकेश वसानी, निर्मल वसानी, शर्मिलाबेन लखनभाई बंबभनिया हे कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहेत. कंपनी अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांकडून २४.७३ टक्के निधी उभारणार आहे.
 
ही कंपनी २०११ साली स्थापन झाली होती. इलेक्ट्रिक संबंधित सिस्टीम डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग सेवा कंपनी पुरवते. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०२३ डिसेंबर ३१ पर्यंत ६७६४.१७ कोटी होता. तर ३१ मार्च २०२३ मधील करोत्तर नफा (Profit After Tax) ८६३.१९ कोटी होता जो ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढत ९७६.६६ कोटी झाला होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल ३२१.१९ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर थकीत देयासाठी, भांडवली खर्च करण्यासाठी, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.