संदेशखालीचा कसाई शाहजहानच्या विरोधात आरोपपत्र दाखल

    28-May-2024
Total Views |
 SHAIKH SHAJAHAN
 
कोलकाता : पश्चिम बंगालसह देशाला हादरून सोडणाऱ्या संदेशखाली प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. संदेशखाली येथे दि. ५ जानेवारी २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीबीआयने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता शाहजहान शेख आणि इतर सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
 
तपास यंत्रणांनी सोमवारी विशेष न्यायालयासमोर या प्रकरणातील पहिले आरोपपत्र दाखल केले, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमधील कोट्यवधींच्या रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी शेख शाहजहानच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक गेले होते, शेख शाहजहानच्या ठिकाणावर छापेमारीवेळी कट्टरपंथी जमावाने ईडीच्या पथकावर हल्ला केला होता.
 
 
राशन घोटाळ्यात चौकशी सुरू असलेल्या राज्याच्या माजी अन्न मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांच्याशी त्याच्या कथित घनिष्ठ संबंधांमुळे शेखला अटक करण्यासाठी टीम गेली होती. कोलकात्यापासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेले संदेशखाली, स्थानिक महिलांनी शेख आणि त्याच्या गुंडांवर मत्स्यशेती आणि जमीन बळकावण्याच्या आणि लैंगिक शोषणाच्या व्यापारात गुंतलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. ते म्हणाले की, सीबीआयने ५ जानेवारीला घडलेल्या घटनांशी संबंधित तीन प्रकरणांचा तपास हाती घेतला आहे.