केजरीवाल यांच्या मंत्र्याने नोकरी मागायला गेलेल्या महिलेचा केला विनयभंग; व्हिडिओ व्हायरल होऊनही कारवाई नाही

    28-May-2024
Total Views |
 Balkar Singh Minister
 
चंदीगढ : पंजाबचे स्थानिक प्रशासन आणि संसदीय कामकाज मंत्री बलकार सिंह वादात सापडले आहेत. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते व्हिडिओ कॉलवर एका महिलेसोबत लैंगिक कृत्य करताना दिसत आहे. मात्र, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. जालंधरचे माजी उपायुक्त असलेले बलकार सिंह यांनी २०२१ मध्ये AAP (आम आदमी पार्टी) च्या तिकिटावर करतारपूरमधून आमदार झाले होते. आता राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW)ही या घटनेवर चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
या प्रकरणाचा निष्पक्ष आणि जलद तपास व्हायला हवा, असे एनसीडब्ल्यूने म्हटले आहे. हा खुलासा भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी केला आहे, ज्यात त्यांनी बलकार सिंह यांच्यावर अनुचित लैंगिक कृत्य केल्याचा आरोप केला आहे. ज्या महिलेसोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले ती महिला त्याच्याकडे नोकरीसाठी मदत मागत होती, असे सांगण्यात आले. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पंजाबच्या डीजीपींना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे. याशिवाय १५ दिवसांत सविस्तर अहवालही मागवण्यात आला आहे.
 
 
राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे की आयपीसी (भारतीय दंड संहिता) कलम ३५४ (महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील व्हिडिओ दाखवणे) आणि ३५४B अंतर्गत एफआयआर नोंदवला जावा. या प्रकरणावरून भाजपने बलकार सिंह यांच्यावरही निशाणा साधला. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, या आक्षेपार्ह व्हिडिओमध्ये आप मंत्री एका मुलीसोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत.
 
सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, हा तोच पक्ष आहे ज्याच्या महिला खासदाराशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात गैरवर्तन करण्यात आले, त्यानंतर पीडितेचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते 'शीशमहल'मध्ये माजी डीसीडब्ल्यू (दिल्ली महिला आयोग) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाणीचा संदर्भ देत होते. पंजाबच्या मंत्र्यांच्या गैरकृत्यांबाबत हे लोक तोंडात दही घेऊन बसले आहेत, असे सुधांशू त्रिवेदी म्हणाले.