ओपेक राष्ट्रांच्या बैठकीपूर्वी कच्च्या तेलाच्या निर्देशांकात 'इतकी' वाढ

भारतात क्रूडची प्रति बॅरेल किंमत ६५६३ रुपयांवर

    28-May-2024
Total Views |

Crude Oil
 
मुंबई: जागतिक पातळीवरील ओपेक (Organisation of the Petroleum Exporting Countries and its allies) राष्ट्रांची बैठक २ जूनपर्यंत होण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. आगामी काळात तेल उत्पादनात कपात करावी की नाही यावर या बैठकीत मंथन होण्याची शक्यता असल्याने यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
 
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा दबाव वाढल्याने, तसेच ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रैयसी यांच्या निधनानंतर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः उत्पादनातील वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात ओपेक देश कपात करतील की नाही या हेतूने बाजारात क्रूड तेलाच्या किमतीत चढउतार सुरु झाली आहे.
 
सकाळी ११ पर्यंत क्रूड (कच्च्या) तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील एमसीएक्स निर्देशांकात ०.२४ टक्क्यांनी वाढ होत तेलाची किंमत प्रति बॅरेल किंमत ६५६३ रुपयांवर पोहोचली आहे.
 
जर ओपेक राष्ट्रांनी तेल निर्मितीत कपात केल्यास वर्षाच्या दुसऱ्या सत्रात मोठे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का याचा निर्णय देखील आगामी काळात घेतला जाणार असल्याने त्याचा परिणाम तेला च्या किंमतीत होऊ शकतात. डॉलरच्या किंमतीत झालेली वाढ किंवा घसरण त्यामुळे आगामी काळात तेलाच्या दरात महत्वाची भूमिका बजावू शकते.
 
आजच्या बाजारातील कच्च्या तेलांच्या हालचालीवर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्च सिनियर मॅनेजर कायनात चैनवाला म्हणाले, ' डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल फ्युचर्स सोमवारी वाढले, तीन महिन्यांच्या नीचांकीवरून परत आले, कारण गुंतवणूकदारांनी या आठवड्याच्या शेवटी एका आभासी बैठकीत OPEC+ निर्णयाची प्रतीक्षा केली. आधीच नाजूक चिनी आर्थिक दृष्टीकोन आणि वाढत्या नॉन-ओपेक पुरवठ्याशी झगडत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींना आळा घालण्याच्या प्रयत्नात OPEC २H २०२४ पर्यंत सध्याच्या पुरवठ्यावरील अंकुश वाढवेल अशी अपेक्षा आहे. या आठवड्यापासून पेट्रोलची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मेमोरियल डे सुट्टी ही यूएस मध्ये पीक ड्रायव्हिंग कालावधीची सुरुवात म्हणून पाहिली जाते. इस्रायली सैन्याशी झालेल्या चकमकीत एका इजिप्शियन सैनिकाच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढला, ज्यामुळे काही समर्थन देखील होऊ शकते.'