मुंबई: निवडणूकीनंतरचा काळात भांडवल खर्च, खाजगी वापर, व गुंतवणूक या तिन्ही त्रिसूत्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. एस अँड पी ग्लोबल इंटेलिजन्स या कंपनीने दिलेल्या अहवालात ही पुढील माहिती समोर आली आहे.अहवालात म्हटल्याप्रमाणे, या तिन्ही विभागात मोठी वाढ आल्याने अर्थव्यवस्थेतील घोडदौड वेगाने होण्याची शक्यता आहे. विशेषतः देशाच्या आर्थिक धोरणात नवउर्जा, इलेक्ट्रोनिक, टेक्स्टटाईल,डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिकस, अन्न उत्पादन या मूलभूत क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता नोंदवली गेली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेतील मायक्रोइकॉनॉमिक मुद्दे पाहता या क्षेत्रातील उद्योगांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तसेच औद्योगिक धोरणे, उर्जा संक्रमण, देशातील उद्यमशीलता यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल असे अहवालात म्हटले गेले आहे. अहवालातील माहितीप्रमाणे, या तिमाहीत महागाई दर मागील तिमाहीतील ५.७ टक्यांच्या तुलनेत ५.३ टक्के राहण्याची शक्यता असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
तसेच संस्थेने अहवालात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष संचलित एनडीएला २/३ बहुमत सहज मिळण्याची शक्यता आहे. भारताची वित्तीय तूट (Fiscal Deficit) जीडीपीतील तुलनेत ४.५ टक्यांनी कमी होऊ शकते असे म्हटले आहे. भारताच्या अर्थसंकल्पात सरकारनं ५्१ टक्के वित्तीय तूट भरून काढण्याचे क्लक्ष ठेवले होते.
'आगामी काळात सरकारच्या सेवेत व खाजगी सेवेत तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता आहे. तसेच वैयक्तिक डेटा वापरावर व घरगुती डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर,व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मधील वापरावर नियंत्रण येऊ शकते असे या अहवालात म्हटले आहे. विशेषतः एनडीएला बहुमत न मिळाल्यास 'सोशल वेल्फेअर ' वर भर दिला जाईल. कुठल्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने सगळ्यांना सोबत घेऊन आगामी निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच १०० दिवसांच्या कामगिरीत यांचे पडसाद दिसू शकतात असे यामध्ये म्हटले गेले आहे.