मुंबई: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाची उपकंपनी असलेल्या रडीसीस कॉर्पोरेशन आता अफ्रिकेत पाय पसरणार आहे. आफ्रिकेत आता रिलायन्स संचलित कंपनी टेलिकॉम सुविधा पुरवणार आहे यासाठी कंपनीने आफ्रिकन बाजारात विशेषतः घाना मध्ये नेटवर्क पायाभूत सुविधा, एप्लिकेशन्स, स्मार्टफोन डेव्हलपमेंटसाठी रडीसीस (Radisys) कंपनी नेक्स्ट जेन इन्फ्रास्ट्रक्चर को बरोबर हातमिळवणी करणार आहे. नुकतीच मुंबईत एनजीआयसी (NGIC) ने घोषणा केली.
घाना देशांतील नागरिकांना ५ जी सेवा व टेलिकॉम पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कंपनीने हा संबंधित पुढाकार घेतला आहे. याशिवाय येथे इंटरनेट सुविधा पुरवरली जाईल. कंपनीसाठी नोकिया, टेक महिंद्रा, मायक्रोसॉफ्ट कंपनी देखील यात भागीदारीत असून घाना सारख्या विकसनशील भागात लोकांना नवीन सुविधा पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. ३३ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या घाना या देशात सध्याच्या घडीला एअरटेल टिगो,व्होडाफोन घाना, एमटीएन घाना या तीन टेलिकॉम कंपन्या आहेत. विशेषतः केवळ एनजीआयसी (NGIC) कंपनीने ५ जी सुविधा पुरविल्यास मोठ्या प्रमाणात कंपनीला नवीन ग्राहक व नवीन बाजार उपलब्ध होऊ शकणार आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, घानामध्ये असेंट डिजिटल सोलूशन व के नेट या दोन कंपनीचा एकत्रित शेअर बाजारात ५५ टक्के आहे. एनजीआयसीमध्ये घाना सरकारचा १० टक्के हिस्सा राहणार आहे बाकी वाटा खाजगी कंपन्यांचा असणार आहे. जिओने भारतात स्वस्तात जिओ सुविधा २०१६ मध्ये उपलब्ध करून दिली होती. सध्या जिओ भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आफ्रिकेत विस्तारीकरण केल्याने जिओचा ग्राहकबेस अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.