IPO Update: Ztech कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी २९ मेपासून बाजारात दाखल

प्राईज बँड १०४ ते ११० रुपये प्रति समभाग

    27-May-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: झेडटेक (Ztech India Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात २९ मे पासून दाखल होत आहे.कंपनी ने दिलेल्या माहितीनुसार आयपीओ २९ ते ३१ मे दरम्यान बाजारात दाखल होणार आहे. यावेळी कंपनी गुंतवणूकदारांसाठी ३३.९१ लाख शेअर्सचे फ्रेश इश्यू बाजारात आणणार आहेत. ४ जूनपर्यंत एनएसई एसएमई अंतर्गत ही कंपनी नोंदणीकृत होणार आहे.
 
आयपीओमध्ये कंपनीने १०४ ते ११० रुपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केलेला आहे. एक समभागांचा गठ्ठा (Lot) १२०० शेअर्सचा असेल. या आयपीओत किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी १३२००० रूपये गुंतवावे लागतील.Narolina Financial Services ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार असून Maashitla Securities Private Limited ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. NVS Brokerage कंपनी या आयपीओसाठी मार्केट मेकर म्हणून काम पाहणार आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओसाठी निश्चितीकरण ३ जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ४ जूनपासून मिळू शकतो. एकूण गुंतवणूकीसाठी उपलब्ध असलेल्या वाट्यात ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) गुंतवणूकदारांना उपलब्ध असणार आहे तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असून विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणारआहे. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून (खाजगी गुंतवणूकदार) १०.६३ कोटींचा निधी जमावला आहे.
 
ही कंपनी १९९४ साली स्थापन झाली होती. कंपनी मुख्यतः कंपनी सिविल इंजिनिअरिंग सर्विसेस, तसेच पायाभूत सुविधा व तत्सम सुविधा पुरवते. संगमिता बोरगोहेन व तेरामाया एंटरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड हे. कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहे
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मार्च ३१ पर्यंत कंपनीच्या महसूलात १६०.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये कंपनीला २९६.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १४०.७७ कोटी रुपये आहे.
 
कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार या आयपीओतून उभारलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी व इतर खर्चासाठी वापरला जाणार आहे.