दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! 'या' संकेतस्थळांवर पाहता येणार

    26-May-2024
Total Views |
 
10th result

 
मुंबई : नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाची (10th result) तारीखही जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येईल.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे घोषणा केली. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
 
विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर निकाल पाहता येणार :
 
https://mahresult.nic.in
 
http://sscresult.mkcl.org
 
https://results.digilocker.gov.in
 
https://results.targetpublications.org