मोहित सोमण: गेलेला संपूर्ण आठवडा बाजारात समभागातील चढ उतार अधिक प्रमाणात राहिली. परवा निफ्टीने पहिल्यांदाच २३००० पार केला तर काल अखेरच्या क्षणात बाजारातील रॅली थांबत बाजार सपाट अंकावर बंद झाले. त्या आधी दोन दिवस सलग बाजारात रॅली पहायला मिळाली. बुधवारी सेन्सेक्स १००० अंशाहून अधिक तर निफ्टी ३०० पूर्णांकाहून अधिक वाढले होते. बाजारात काल VIX Volatility Index हा निर्देशांक ६.५८ टक्क्यांनी खाली बंद झाला तर त्यापूर्वी गेले दोन आठवड्यात हा निर्देशांक ९ टक्क्यांपर्यंत चढउतार झाला होता.
दुसरीकडे युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात लवकर कपात करण्याचे शक्य नसल्याचे संकेत युएस फेडरल रिझर्व्ह बैठकीतील मिनिट्समध्ये दिले गेले होते. तसेच अमेरिकेतील बेरोजगारीचे आकड्यात अपेक्षित बदल झालेला नाही. याशिवाय अमेरिकन बाजारात २ टक्क्यांपर्यंत महागाई खाली येणे सध्या शक्य नसल्याने बाजारात इतक्यात व्याजदरात कपात होणार नाही. याशिवाय मध्य आशियातील इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या अपघातानंतर व ओपेक राष्ट्रांनी आगामी काळात बैठक बोलावली असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत हालचाली झाल्या.
प्रामुख्याने काही वेळा क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली तर काही वेळा घसरण. पण मुख्यतः क्रूड तेलाच्या साठ्यात वाढ व मागणीत घट झाल्याने बाजारातील कच्च्या तेलाचे दर संतुलित राहिले आहेत. दुसरीकडे भारतातील कंपनीचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा अधिक चांगले असल्याने व भारतात निवडणूकीचे निकाल जवळ आल्याने बाजार चढ उतार सुरु होता. मागील आठवड्यात बाजारातील लार्जकॅप प्रमाणेच मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये हालचाल पहायला मिळाली होती.
भारतातील नुकतेच रिझर्व्ह बँकेने विदेशी मुद्रा साठ्यात वाढ केली आहे. एचएसबीसी कंपोझिट आऊटपुट इंडेक्स आकडेवारी नुसार भारतातील औद्योगिक उत्पादनात व सेवा क्षेत्रातील प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.बाजारातील एकूण विकास वाढ देखील ७ टक्क्यांपर्यंत राहू शकतो असे आरबीआय बुलेटिनमध्ये म्हटले गेले होते. एकंदरच अमेरिकन बाजारातील अस्वस्थता, मध्य पूर्वेतील दबाव असताना भारताने देशांतर्गत चांगली कामगिरी केल्याने बाजारात भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मागील आठवड्यात काढून घेतली.परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याचे निश्चितच आव्हान पुढील आठवड्यातही दिसत आहे मात्र भारतातील निर्देशांकात वाढ होत असल्याने त्याचा प्रभाव आगामी शेअर बाजारात कसा राहिल हे पहाणे महत्वाचं ठरणार आहे.
आगामी बाजार गुंतवणूकदारांसाठी कसा ठरू शकतो याबद्दल काही तज्ञांची मते जाणून घेऊयात -
१) अजित भिडे (ज्येष्ठ बाजार अभ्यासक) - मागील सप्ताहात एकंदरीत चांगली कमाई झाली. अमेरिकेतील बाजाराकडे अजिबात लक्ष न देता ही तेजी आपण सर्वांनी अनुभवली. स्थिर असलेले कच्चे तेल,स्थिर अपेक्षित सरकार तसेच जागतिक पातळीवर महागाई आटोक्यात येत असल्याबद्दलची शक्यता अमेरिकेतील निवडणूकापर्यंत एकदा तरी व्याज दरात कपात होउ शकेल असा वाटणारा एक गुंतवणूकदार वर्ग आजही अमेरिकेतील व्याजदर कपातीवर लक्ष ठेऊन आहे. कारण आपल्याला भारतातसुद्धा व्याज दर कपाती लक्ष द्यायलाच लागेल. महगाई नियंत्रणात आहे. मागील ९ सभांमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले आहेत.हेच सरकार परत निवडून आल्यावर कदाचित आर्थिक सुधारणांकडे लक्ष केंद्रित करू शकतात. रिझर्व्ह बँकेने घसघशीत लाभांश आत्ताच जाहीर केलेला आहे.तसेच जगातील अर्थव्यवस्थेत आपली अर्थव्यवस्था ही नक्कीच सकारात्मक व ६-७ % जीडीपी देत आहे.अनेक क्रेडीट एजन्सीकडून भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगले बोलले जात आहे.
पुढील काही वर्षांत तिसरी आर्थिक महासत्ता व नंतर सुधारणारा देश वरून सुधारलेला देश या श्रेणीत पुढील काही वर्षांत जर भारताला पहायचं असेल तर औद्योगिक उत्पादन हा विषय व्याजदराशी निगडीत आहेच. उत्पादन मुल्य हे जागतिक पातळीवर निश्चितच तुलनात्मक दृष्टिने वाजवी असणे महत्वाचे आहे.भारताची निर्यात दरवर्षी किमान २०% वाढीचे उद्दीष्ट ठेवल्यास हे शक्य होऊ शकेल. यामधे संरक्षण क्षेत्राचा विचार केला तर ही वाढ निश्चितपणे पूर्णही होउ शकेल. कारण संरक्षण (डिफेन्स) रिसर्च व उत्पादन या विषयातील भारताची मागील ५-६ वर्षांत निश्चित च लक्षणीय प्रगती आहे.निर्यात धोरण ही चांगले आहे.
परराष्ट्रधोरण ही चांगले आहे.खाजगी व सरकारी कंपन्यांचे वार्षिक आकडे बघितल्यावर आपण ही अपेक्षा निश्चितच पूर्ण करू शकतो. भविष्यातील अनेक कंपन्यांना व्याज दरात कपात ही देशासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतात. एकंदरीत कमी व्याज दर हे देशांतर्गत उत्पादन वाढीचे व निर्यातीस फायदेशीर होईल.भारतातील येणारे नवीन सरकार मागील १० वर्षांतील राहिलेल्या अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतील. औद्योगिक उत्पादन वाढीचे व निर्यातीचे नवीन उच्चांक ठेवतील तरच शेअर बाजारही नवीन उच्चांक गाठत राहील. आज वाढलेल्या अपेक्षांचे ओझे सरकार वर निश्चितच असणार आहे. वरील नमुद निर्यात लक्ष,व्याज दर कपात,उत्पादन वाढीचे उद्दीष्ट हे नवीन उच्चांक हे शेअर बाजारातला अपेक्षित आहेत.
त्यामुळे आपोआपच बॅका,फायनान्स क्षेत्र व नवीन नवीन टेक्नॉलॉजी व इतर सर्व उत्पादन करणारे लार्ज ,मिडकॅप, स्माॅलकॅप व सर्वाधिक महत्वाचा लघुउद्योग यांना याचे फायदे प्रत्यक्ष मिळतील. आज आपण लघुउद्योगांना व्याज दरात सबसिडी देत आहोत. या सर्व गोष्टी लक्षात घेता व्याजदरात कपात ही भारतात ही अपेक्षित आहेच. मागील आठवड्यात झालेली शेअर बाजारातील वाढ,या आठवडयात थोडाफार नफा वसुली करत करत वाढ सूरूच राहील असे वाटतेय. पण ठराविक कंपन्यांत तेजी राहीलच त्याला निर्देशांकाचे बंधन असणार नाही.जर हा आठवडाही जोरदार तेजीतच राहीला तर निवडणूक निकालानंतर सेल ऑन न्यूज हा फंडा असू शकेल.
२) अजित मिश्रा (रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड - बेंचमार्क निर्देशांकांनी त्यांचा विक्रम पुन्हा प्राप्त केल्यामुळे इक्विटी मार्केटसाठी हा आठवडा अनुकूल ठरला. इक्विटी बाजार सुमारे २ टक्क्यांनी वाढले. सकारात्मक टोन सुरुवातीपासूनच दिसून आला,जागतिक बाजारांवर प्रभाव पडला, परंतु गुरुवारी निवडक हेवीवेट्समधील जोरदार खरेदीमुळे सकारात्मक भावनेत लक्षणीय वाढ झाली. म्हणून परिणामी, निफ्टीने २३००० चा नवा टप्पा गाठला आणि सेन्सेक्स आठवड्याच्या ७५,४१०.३ उच्चांकाच्या जवळ बंद झाला.
सर्व प्रमुख क्षेत्रांनी या चळवळीला हातभार लावला, ज्यामध्ये धातू, ऊर्जा आणि ऑटो आघाडीवर आहेत. दरम्यान, विस्तृत निर्देशांकांनी संमिश्र कामगिरी दर्शवली, मिडकॅप्स सुमारे १% वाढले तर स्मॉलकॅप्स लाल रंगात संपले.येत्या आठवड्याची वाट पाहता,कमाईच्या हंगामातील निवडणुका, जागतिक संकेत आणि अंतिम टप्प्यावर लक्ष राहील.जागतिक स्तरावर, ट्रेंड मिश्रित आहेत: डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी (DJIA) झपाट्याने वाढली आहे. टेक-हेवी NASDAQ आणि व्यापक S&P ५०० अजून ही लवचिकता आणि उच्च इंचिंग दाखवत असताना, त्याच्या विक्रमी उच्चांकावरून मागे हटले आहे.
गेल्या दोन आठवड्यांतील बाजारातील तेजीने मागील मंदीच्या भावनांचा प्रतिकार केला आहे आणि आम्ही निफ्टी लवकरच २३१५०-२३४०० श्रेणीकडे जाण्याची अपेक्षा आहे. घट झाल्यास, २२२५०-२२८०० झोन मजबूत समर्थन प्रदान करणे अपेक्षित आहे. सर्व प्रमुख क्षेत्रे रॅलीमध्ये योगदान देत असताना, बँकिंग आणि आयटी मध्ये अजूनही लक्षणीय उलथापालथ क्षमता आहे आणि त्यांचा सहभाग निर्देशांकाला खूप वर नेऊ शकतो. अल्पकालीन व्यवहारांसाठी मोठे मिड-कॅप स्टॉकला प्राधान्य देत पातळी लार्ज-कॅपला प्राधान्य देऊन आणि स्टॉक-विशिष्ट ट्रेडिंग पध्दत सुरू ठेवण्याची आम्ही शिफारस करतो.
गेल्या आठवड्यातील परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) केलेल्या विक्रीवर प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे चीफ इन्व्हेसमेंट स्ट्रेटेजिस्ट वी के विजयकुमार म्हणाले, 'एप्रिलमध्ये सुरू झालेली एफआयआयची विक्री मे महिन्यात महापूरात रूपांतरित झाली. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार एफआयआयने २४ मेपर्यंत २२,०४६ कोटी रुपयांची इक्विटी विकली. रोख बाजारात एफआयआयची विक्री ३३४६० कोटी रुपयांवर प्रचंड होती. ही प्रचंड विक्री होती. चायनीज शेअर्सच्या मोठ्या प्रमाणा तील कामगिरीने चालना दिली आहे, ज्यामध्ये चीनी एच स्टॉक्सचे वर्चस्व आहे (एफआयआय हाँगकाँग मार्केटमधून गुंतवणूक करतात कारण शांघाय मार्केटमधून गुंतवणूक करण्यावर निर्बंध आहेत एच स्टॉक्सचे मूल्यांकन ७.६६ % वाढले आहे हँग सेंग सुमारे ९ च्या पीई मल्टिपलपर्यंत क्रॅश झाला होता आणि एफआयआयने खरेदीला प्रेरित केले होते, ज्यामुळे 'भारत विका, चीन व्यापार खरेदी करा.'
निवडणुकीशी संबंधित गोंधळांचाही एफआयआयच्या विक्रीवर परिणाम झाला असावा. मतदानाच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदानात घट झाल्याच्या बातम्यांनी बैलांना लगाम घातला. भाजप/एनडीएसाठी हा सहज विजय होणार नाही, या मताला बाजाराने मोठ्या प्रमाणात सूट दिली होती. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने परिस्थिती पुन्हा एकदा हळूहळू बदलत आहे. बेस केस परिस्थिती भाजप/एनडीएच्या बाजूने स्पष्ट निकाल असल्याचे दिसते. तसेच, FII ची मोठ्या प्रमाणावर विक्री थांबली आहे आणि अलीकडच्या काळात त्यांनी खरेदीदार देखील केले आहेत. पुढे जाऊन, निवडणुकीच्या आघाडीवर स्पष्टता दिसू लागल्याने, FII भारतात खरेदी करतील कारण त्यांना निवडणूक निकालानंतरची रॅली चुकवणे परवडणारे नाही. वास्तविक, निवडणुकीच्या निकालापूर्वीच रॅली सुरू होऊ शकते.'