IPO Update: २८ मे पासून बिकॉन ट्रस्टशिप आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होणार

कंपनीकडून प्रति समभाग ५७ ते ६० रुपये प्राईज बँड निश्चित

    25-May-2024
Total Views |

Beacon Trustship
 
 
 
 
मुंबई: बिकॉन ट्रस्टशिप (Beacon Trusteeship) या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी २८ मे २०२४ पासून खुला होणार आहे. २८ ते ३० मे या काळात हा आयपीओ (IPO) उपलब्ध असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रति समभाग ५७ ते ६० रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ एनएसई एसएमई अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे. कंपनी ४ जूनपासून नोंदणीकृत (लिस्टिंग) होणार आहे.
 
समभागांचा एक गठ्ठा (Lot) २००० समभागांचा (Shares) असणार आहे. कंपनी ३८.७२ लाख इक्विटी शेअर्स बाजारात गुंतवणूकीला आणेल. किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी या आयपीओसाठी १२०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, कंपनीकडून आयपीओ समभागाचे वाटप ३१ मे पर्यंत करण्यात येईल. अपात्र झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा जून ३ पर्यंत करण्यात येईल.
 
एकूण आयपीओमधील समभागापैकी ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) यांच्यासाठी उपलब्ध असेल तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ३५ टक्क्यांपर्यंत वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर विना संस्था त्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) प्रसन्ना अनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रतापसिंह इंद्रजितसिंह नथानी आहेत. आयपीओआधी कंपनी ९.२५ कोटींचा निधी अँकर (खाजगी)गुंतवणूकदारांकडून जमवणार आहे.
 
Beacon Trusteeship कंपनी डिंबेचर ट्रस्टी कंपनी आहे. ही कंपनी डिबेंचर, सिक्युरिटीज ट्रस्टी इन्व्हेसमेंट, ट्रस्टी अल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट फंड यासारख्या गुंतवणूक सुविधा कंपनी पुरवते. ही कंपनी २०१५ साली स्थापन झाली होती.
 
मार्च ३१, २०२४ पर्यंत कंपनीला करोत्तर नफा (Profit After Tax) ३४.२५ टक्क्यांनी वाढत ५१६.३६ कोटी झाला होता. तर ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीला महसूल ३३ टक्क्यांनी वाढत २०९१.२० कोटींवर पोहोचला होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) १०८.३९ कोटी आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर टेक्नॉलॉजी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी,एका कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी, नवीन कार्यालय परिसर खरेदी करण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी केला जाणार आहे.