मुंबई: एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात बदल झाले आहेत. यामध्ये विप्रो कंपनी सेन्सेक्स ३० मधून बाहेर गेली असून अदानी समुहाची अदानी पोर्टसची एन्ट्री या निर्देशांकात (Index) मध्ये झाली आहे. बेंचमार्क ३० मध्ये येणारी अदानी पोर्टस व स्पेशल इकॉनॉमिक झोन ही समुहाची पहिली कंपनी ठरली आहे.
ही घडामोड काल घडली असून काल अदानी समुहाच्या समभागात ५ ते ८ टक्क्यांनी वाढ झाली होती. अदानी समुहाच्या समभागात २०२४ मध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे तर विप्रो कंपनीच्या समभागात ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. याशिवाय निर्देशांकात आणखी काही बदल झाले आहेत ज्यामध्ये आरईसी, एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी, कॅनरा बँक, कमिन्स इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांचा बीएसई १०० निर्देशांकात समावेश झाला आहे. या कंपनीच्या येण्यामुळे पेज इंडस्ट्रीज, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्विसेस, ज्युबिलंट फूड वर्क्स, झी एंटरटेनमेंट एंटरप्राईज या कंपन्यांची गच्छंती झाली आहे. तसेच बँक निर्देशांकात एयु स्मॉल फायनान्स बँक व आयडीएफसी बँक यांना येस बँक व कॅनरा बँक यांचा समावेश होणार आहे.