पश्चिम उपनगरात जलवाहिनी दुरुस्तीचे काम

जलवाहिनींच्या कामामुळे पाणीकपात

    25-May-2024
Total Views | 15

bmc


मुंबई,दि.२५: प्रतिनिधी 
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रासिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रासिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवार, दिनांक २९ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दि. ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व) व (पश्चिम), विलेपार्ले (पूर्व) व (पश्चिम) या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरुपी सुधारणा होणार आहे. या दुरुस्ती कालावधीत म्हणजे बुधवार, दिनांक २९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दिनांक ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) के पूर्व, के पश्चिम व पी दक्षिण विभागातील खालील नमूद केलेल्या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद

के पूर्व विभाग-
दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदीर परिसर जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, दुर्गा नगर, सारीपुत नगर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर, वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग, पंप हाउस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर

पी दक्षिण विभाग
– राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम)

के पश्चिम विभाग
– जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० जुहू-कोळीवाडा झोन के पश्चिम - ११), सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजारपेठ, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप, देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता ते जोगेश्वरी बस आगार), के पश्चिम विभाग– विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई उदयान, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३० विलेपार्ले झोन – के पश्चिम ०९), मोरागाव, जुहू गावठाण, यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (भाग), गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर

पाणीपुरवठा कमी दाबाने

१) के पूर्व विभाग- त्रिपाठी नगर, मुन्शी वसाहत, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर वसाहत मातोश्री क्लब, दुर्गा नगर - सकाळी ८.०० ते सकाळी ९.०० वाजेदरम्यान पाणीपुरवठा होईल.

९) पी दक्षिण विभाग– बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल परिसर
 
१४) के पश्चिम विभाग– चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता


अग्रलेख
जरुर वाचा

'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप; गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121