अबकी बार मोदी सरकार म्हटल्याची शिक्षा! सलीमनं महिलेसह दोन मुलांना केली मारहाण
24-May-2024
Total Views |
लखनऊ : अबकी बार मोदी सरकार म्हटल्याने महिला आणि मुलांना घरात घुसून मारहाण करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये मुस्लीम महिला सबा नाज आणि तिच्या दोन मुलांना सलीम पन्नी नावाच्या कट्टरपंथीने त्याच्या पाच ते सहा साथीदारांसोबत घरात घुसून जबर मारहाण केली. आई सबा आपल्या दोन मुलांसोबत राजकीय गप्पा मारत होती. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ निवडून येणार, असा विश्वास सबा नाज यांनी व्यक्त केला होता. दरम्यान त्यांचा हा संवाद बाहेरून जाणाऱ्या सलीमने ऐकला आणि त्याला संताप अनावर झाला. तो आपल्या सहा ते सात मित्रांसोबत एकटी असलेल्या सबाच्या घरी शिरला.
सलीमने सबाशी गैरवर्तन केले. हा प्रकार रात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास सुरू झाला. तो रात्री तिच्या घरी पोहोचला आणि दरवाजा ठोठावला. तिने महिला आणि तिच्या मुलांना मारहाण सुरू केली. करेली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआर नुसार, सबा नाज आपल्या मुलगा आणि मुलीसह २२ मे रोजी लोकसभा निवडणूकीबद्दल संवाद साधत होती. याच्या आदल्या दिवशी मतदान पार पडले होते. पीडितेची मुले मोदी सरकारच्या कामाबद्दल बोलत होते. मोदी सरकार सत्तेत येईल का? याविषयी आईला विचारत होते. यावेळी तिथून जाणाऱ्या सलीमने हे संभाषण ऐकले. त्याला हा प्रकार सहन झाला नाही. त्याने दुचाकी थांबवत पीडितेला शिव्या घालण्यास सुरुवात केली. तसेच तिला धमकीही दिली.
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, २२ मे रोजी रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान सलीम पन्नी आणि त्यांचे पाच ते सहा साथीदार घरात घुसले. सगळे नशेत दिसत होते. नऊ वर्षांच्या नाबालीक मुलाला धमकावून दरवाजा उघडला. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ सुरू केली. दोन्ही मुलांना मारहाण केली आणि फरार झाले. आमच्या कुटूंबाला संपविण्याची धमकीही दिली. पीडितेचे पती सुफियान अहमद हे भाजपचे समर्थक आहेत. मुस्लीम मंचाचे सहसंयोजकही आहेत. त्यामुळे त्याचा राग सलीमच्या मनात आहे. यापूर्वीही सलीमने अशा प्रकारची मारहाण काही ठिकाणी केली आहे. आमच्या कुटूंबियांना सुरक्षा द्या, अशी मागणी तिने केली आहे. करेली पोलीसांनी या प्रकरणात कलम 147, 323,504,506, 452 आणि 354 (ख) अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. घटनेच्या काही तासांतच पोलीसांनी पन्नीला अटक केली आहे.