बाबरी ढाचा कोसळताना केलेला 'तो' संकल्प अखेर पूर्ण

    24-May-2024
Total Views |

Swaminath Sharma

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
चेन्नईचे रहिवासी स्वामीनाथ शर्मा (Swaminath Sharma Sankalp) यांनी बाबरी ढाचा कोसळण्याच्या वेळी रामललासमोर वाल्मिकी रामायणातील रामजन्म भागाचे पठण करण्याचा संकल्प केला होता. तो अखेर पूर्ण झाला आहे. श्री रामललासमोर वाल्मिकी रामायणातील श्रीराम जन्माच्या १८ व्या श्लोकाचे पठण करत आपला संकल्प पूर्ण केला आहे. स्वामीनाथ शर्मा हे वेदपाठी असून ते वेद पाठशाळाही चालवतात.

हे वाचलंत का? : मतदान करताना राष्ट्राचे व्यापक ध्येय विसरता कामा नये! : राम माधव

प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने स्वामीनाथही अयोध्येत आले होते. मात्र भाविकांची प्रचंड संख्या पाहता संकल्प पूर्तीची तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. मात्र आता १०१ भाविकांनी वाल्मिकी रामायणातील श्रीराम जन्माच्या १८ व्या श्लोकाचे मंदिराच्या संकुलातील यज्ञस्थळी पठण केले. दरम्यान ५० पुरुष, ४५ स्त्रिया आणि काही मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनीही स्वामीनाथजींच्या संकल्पाची माहिती घेऊन त्यांच्या समुहासह यज्ञशाळेत पारायणाची सर्व व्यवस्था केली.