शेअर बाजार विश्लेषण: सकाळी वाढ संध्याकाळी अखेरच्या मिनिटांत बाजार सपाट ! जागतिक मिश्र वातावरणात 'अंडरकरंट ' कायम सेन्सेक्स ७.६५ तर निफ्टी १०.५५ अंशाने घसरला

स्मॉलकॅपमध्ये घसरण ! बँक निर्देशांकात वाढ

    24-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सपाट घसरण झाली आहे. बाजारातील अखेरच्या क्षणी बाजारातील निर्देशांक किंचित खाली घसरले आहेत. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ७.६५ अंशाने घसरत ७५४१०.३९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०.५५ अंशाने घसरत २२९५७.१० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेर पर्यंत १७८.३६ अंशाने वाढत ५५९१८.५० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २०३.०५ अंशाने वाढत ४८९७१.६५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएईतील मिडकॅपमध्ये ०.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.२३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसईत मिडकॅपमध्ये ०.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.०१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आज संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे.
 
आज क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये सर्वाधिक वाढ मिडिया (१.०४%), फायनाशियल सर्विसेस (०.५६%), फायनाशिंयल सर्विसेस २५/५० (०.५१%), प्रायव्हेट बँक (०.४१%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण आयटी (०.६४%), फार्मा (०.५०%), एफएमसीजी (०.८०%) मेटल (०.३१%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत (BSE) मध्ये आज ३९४५ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १७०० समभाग वधारले असून २१४३ समभागात घसरण झाली आहे तर २१५ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ झाली आहे तर ३३ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. २४३ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २७३ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत (NSE) मध्ये आज २७४२ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १२९ समभाग वधारले असून १५२६ समभागात घसरण झाली आहे. १२९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १७ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ९० समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ८३ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४१९.९१ लाख कोटी रुपये आहे तर एनएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल ४१६.०४ लाख कोटी होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत रुपयांची किंमत वधारल्याने रुपयांची किंमत ८३.५२ रुपयांवर पोहोचली आहे.
 
आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता पुढे ढकलली गेल्याने सकाळी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. एमसीएक्सवर सोन्याचे निर्देशांक ०.११ टक्क्यांनी घसरले होते मात्र संध्याकाळपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील युएस गोल्ड स्पॉट दरात ०.६० टक्क्यांनी वाढ झाली होती तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.३० टक्क्यांनी वाढ झाली होती.
 
संध्याकाळपर्यंत भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात सोन्याचा निर्देशांकात ० टक्के बदल होत ७१५८० रुपयांवर सोने स्थिर राहिले आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील सोन्याचे दल संध्याकाळपर्यंत घसरले होते. २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम किंमत ९०० रुपयांनी घटली होती तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम किंमत ९८० रुपयांनी घटली होती.
 
जागतिक पातळीवरील क्रूड (कच्च्या) तेलाच्या किंमतीत मोठी चढ उतार पहायला मिळत आहे. वाढलेल्या साठल्यामुळे व युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता दूर झाल्याने बाजारातील क्रूडचे भाव आटोक्यात आले होते. क्रूड तेलाच्या मागणीतही घट झाल्याने बाजारात क्रूड तेल स्वस्त झाले होते. संध्याकाळपर्यंत WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८५ टक्क्यांनी घसरण होत पातळी ७६.२२ वर पोहोचली होती. तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.७५ टक्क्यांनी घसरण होत ८०.७५ पातळीवर क्रूड पोहोचले होते. भारतातील एमसीएक्सवर क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.७२ टक्क्यांनी घसरण होत क्रूडचे दर ६३५१ प्रति बॅरेल किंमतीवर पोहोचले आहेत.
 
बाजारातील सकाळपर्यंत रॅली कायम होती.दिवसभरात अनेक समभागांनी चांगली कामगिरी केली होती. अनेक शेअर्समध्ये ८ ते १५ टक्यांनी वाढ झाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये चढ उतार कायम राहिल्याने बाजारात त्याचा प्रभाव राहिला. दुसरीकडे बँक निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारातील अखेरपर्यंत कायम राहिली आहे.
 
युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात इतक्यात होण्याची शक्यता नसल्याने युएसने सांगितल्यावर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भारतीय सकारात्मक आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित केले होते.ब्लू चिप्स कंपनीच्या समभागात गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला तसेच आलेल्या तिमाही निकालावर व आगामी निकालावर गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला असताना परदेशी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा कायम ठेवत निवडणुक निकालांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक काढून घेण्याचे सत्र कायम ठेवले आहे.
 
कालपर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४६७०.९५ कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती. दुसरीकडे फेडरल रिझर्व्ह बैठकीतील मिनिट जाहीर झाली असताना काल बाजारात वाढ झाली मात्र पुन्हा कुठलाही नवीन मुद्दा नसल्याने व निवडणूकीचा सिझन असल्याने बाजारात चढ उतार पहायला मिळाला आहे. अखेरीस सकाळीही बाजार वाढल्यानंतर संध्याकाळी मात्र बाजार सपाट मूल्यांकनात बंद झाले आहे. जागतिक पातळीवरील संमिश्र प्रतिसाद कायम असताना भारतातील चांगल्या प्रदर्शनामुळे बाजारातील निर्देशांकात घट झाली असली तरी 'अंडरकरंट' कायम आहे निवडणूक निकाल लागेपर्यंत अशी चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
 
बीएसईत आज एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, लार्सन, एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, मारूती सुझुकी, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक समभागात वाढ झाली आहे तर एशियन पेंटस, टेक महिंद्रा, आयटीसी, एम अँड एम, टायटन कंपनी, जेएसडब्लू स्टील, एचसीएलटेक, एचयुएल, सनफार्मा, इन्फोसिस, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, पॉवर ग्रीड, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा, नेस्ले, टाटा मोटर्स या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत एचडीएफसी बँक, लार्सन, भारती एअरटेल, बीपीसीएल, एक्सिस बँक या समभागात वाढ झाली आहे तर अदानी पोर्टस, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, आयटीसी, टायटन, एम अँड एम, टीसीएस, एशियन पेंटस, अपोलो हॉस्पिटल जेएसडब्लू स्टील, ब्रिटानिया, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एचसीएलटेक, सनफार्मा, डॉ रेड्डीज, ग्रासीम, हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, रिलायन्स, पॉवर ग्रीड, कोटक महिंद्रा, नेस्ले,आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, सिप्ला, बजाज ऑटो, अदानी एंटरप्राईज, एचडीएफसी लाईफ, अदानी एंटरप्राईज, ओएनजीसी या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'अलीकडील यूएस FOMC मिनिटांनी धोरण दरांबाबत सतत कटुता दर्शविल्याने जागतिक बाजारातील भावना दबल्या गेल्या. यूएस बेरोजगार दावे अपेक्षेपेक्षा जास्त घसरले, कॉर्पोरेट नफा निरोगी राहिला, आणि हट्टी चलनवाढ कायम राहिली, फेडला दर कमी करण्याचे कोणतेही कारण देत नाही. दरम्यान, बीएसई पीएसयू निर्देशांकाने पीएसयू बँका आणि संरक्षणाद्वारे चालवलेल्या मजबूत कामगिरीमुळे आणि सुधारित दृश्यमानतेमुळे अल्पावधीत स्थिर गती दर्शविणारी, मोठ्या कॅप्सने नवीन उच्चांक गाठला आहे.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'जागतिक बाजाराचे संकेत कमकुवत राहिल्याने देशांतर्गत बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सर्व वेळच्या उच्च पातळींवरून माघारी फिरले. निफ्टीने २३००० चा टप्पा गाठला तर सेन्सेक्सनेही आज नवा उच्चांक गाठला.
 
बोलीच्या शेवटच्या दिवशी Awfis Space Solutions ची IPO सबस्क्रिप्शन ९.२१ वेळा पूर्ण झाले आहे. गुंतवणुकदारांनी ७.९४ कोटी शेअर्ससाठी बोली लावली, ८६.२९ लाख शेअर्स ऑफरवर आहेत.प्राईज बँड ३६४-३८३ रुपये प्रति शेअर सेट होता. किर कोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्या वाटप केलेल्या कोट्याच्या १८.७३पट सबस्क्राइब केले, तर उच्च नेटवर्थ व्यक्तींसह गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या आरक्षित कोट्याच्या १५.०९ पट सदस्यता घेतली. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (QIBs) आरक्षित कोट्याच्या ३.१ पट सदस्यत्व घेतले आणि कर्मचारी वर्गाने ९.६३ पट अधिक सदस्यता घेतली.'
 
आज रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट कमोडिटी व करंसी जतीन त्रिवेदी म्हणाले, 'रुपया ०.१८ रुपयांनी वाढून ८३.१२ वर बंद झाला. अलिकडच्या दिवसांत डॉलर निर्देशांक जास्त असूनही, भारतातील महत्त्वपूर्ण आर्थिक विकास आणि भांडवली बाजारात DII कडून मोठ्या प्रमाणात निधी प्रवाहामुळे रुपयाने लवचिकता दर्शविली. रुपयाची अपेक्षित श्रेणी ८२.९० ते ८३.३५ दरम्यान आहे.'
 
सोन्याच्या हालचालीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'सोन्याने या आठवड्यात कमकुवत व्यवहार केले आहेत, ७४३५० ते ७१५०० पर्यंत लक्षणीय विक्री अनुभवत आहे, साप्ताहिक उच्चांकावरून २८०० पेक्षा जास्त घसरण आहे. ही घसरण प्रामुख्याने फेडच्या दरात लवकर कपात करण्याच्या कमी होण्याच्या शक्यतेमुळे आहे, जसे की या पुलबॅकनंतरही, सोन्यामध्ये एकूणच तेजी कायम आहे आणि या आठवड्यातील घसरण ६९०००च्या आधारभूत समर्थनासह,६६००० कडे आणखी विक्री होऊ शकते.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, ' गुरुवारच्या सपाट सुरुवाती नंतर,बाजार शांतपणे व्यवहार करत होता आणि जवळजवळ अपरिवर्तित होता. निफ्टी संपूर्ण सत्रात एका अरुंद श्रेणीत फिरला परंतु थोडक्यात २३००० चा नवीन टप्पा गाठण्यात यशस्वी झाला. दरम्यान, विविध क्षेत्रातील संमिश्र प्रवृत्तीने व्यापाऱ्यांना गुंतवून ठेवले, ऑटो, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली, तर FMCG आणि रियल्टीने नफा मिळवण्याचा अनुभव घेतला. व्यापक निर्देशांकांचेही निःशब्द सत्र होते, जे जवळजवळ सपाट बंद होते.'
 
मजबूत वरच्या हालचालीनंतर विराम दिसणे सामान्य आहे आणि व्यापाऱ्यांनी निफ्टीमध्ये २२८५०-२२८५० च्या आसपास कोणतीही घसरण खरेदीची संधी म्हणून पाहिली पाहिजे. प्रमुख क्षेत्रे ऊर्ध्वगामी हालचालीत योगदान देत असताना, आता आम्ही अधिक निवडक सहभाग पाहत आहोत. त्यामुळे लार्जकॅप आणि लार्ज मिडकॅप समभागांना प्राधान्य देऊन, स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित करणे उचित आहे.'