सोनी पिक्चरचे एन पी सिंह यांनी २५ वर्षांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला म्हणाले, ' ४४ वर्षाच्या....

नवीन व्यक्ती पदभार स्विकारण्यापर्यंत एन पी सिंह पदभार सांभाळणार

    24-May-2024
Total Views |


NP Singh
 
 
मुंबई: सोनी पिक्चर नेटवर्कस इंडिया (Sony Pictures) कंपनीच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन एन पी सिंह यांनी राजीनामा दिला आहे. तब्बल २५ वर्षांनी त्यांनी राजीनामा शुक्रवारी जाहीर केला आहे. याक्षणी त्यांनी  '४४ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आता सामाजिक बदलात लक्ष केंद्रित करायचे असून ऑपरेशनल भूमिकेतून मार्गदर्शकाचा भूमिकेत जाणार ' असल्याचे म्हटले आहे.
 
नवीन व्यक्तीने कार्यभार स्विकारण्यापर्यंत मी पदाची जबाबदारी पार पाडेन असेदेखील एन पी सिंह यांनी म्हटले आहे.' यापदा साठी आम्ही योग्य व्यक्तीची निवड करू यासाठी शोध प्रकिया सुरु असून योग्य व्यक्तीला या पदाचा पदभार देऊ. योग्य व्यक्तीला पदभार देणे हे आमची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
त्यांनी यापुढे बोलताना म्हटले आहे की, 'माझ्या कार्यकाळात आम्ही इंडस्ट्रीतील बेंचमार्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आमच्या कंपनीचा विस्तार केला नेटवर्कची पोच वाढवली. व काही मानके मिळवली होती.' असे त्यांनी विषद केले 'आगामी काळात योग्य व्यक्तीच्या हाताने कंपनीची वाढ होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.' असे पुढे सिंह म्हणाले आहेत.
 
सोनी कंपनीची जपानी मुख्य मातृसंस्था SPNI कंपनीने सोनीचे व झी एंटरटेनमेंट लिमिटेडशी विलीनीकरण (मर्जर) करण्याचे ठरवले होते मात्र ते यशस्वी ठरले नाही व काही काळापूर्वी ते रद्द करण्यात आले होते.