मुंबई: भारताच्या विदेशी मुद्रेत मोठी वाढ झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रा (Foreign Reserve) ४.५४९ अब्ज डॉलरवरून वाढत ६४८.७ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. एकूणच साठ्यात तिसऱ्या आठवड्यात सलग वाढ झाल्याने २.५६१ अब्ज डॉलर्सवरून ६४४.१५१ अब्ज डॉलर्सवर आकडेवारी पोहोचली आहे. मागील महिन्यात हा आकडा ६४४.१५१ अब्ज डॉलर्स होता.
यापूर्वी विदेशी मुद्रेत सर्वाधिक वाढ ५ एप्रिल २०२४ तारखेला वाढ झाली. त्यावेळी हा आकडा ६४८.५६२ अब्ज डॉलर्सवर साठा पोहोचला होता. मे १० पर्यंत विदेशी मुद्रेत ३.३६१ अब्ज डॉलरवरुन ५६९.००९ अब्ज डॉलर्सवर वाढ झाली होती. भारतातील चलनाच्या तुलनेत विदेशी चलनात चढ उतार होत असतो त्यावरून विदेशी मुद्रेचे मूल्यमापन होते.
या आठवड्यात सोन्याच्या साठ्यातदेखील ५७.१९५ अब्ज डॉलर्सवरून १.२४४ अब्ज डॉलर्सवर वाढ झाली होती. स्पेशल ड्राईग राईट्स (SDR) मध्ये ११३ दशलक्ष डॉलर्सवरून १८.१६८ अब्ज डॉलर्सवर वाढ झाली असल्याचे आरबीआयने म्हटले.इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) वरील भारताची राखीव स्थिती ४.३२७ अब्ज डॉलर्सलरून घसरत १६७ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे.