मुंबई, दि.२३ : प्रतिनिधी चोवीस डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ ची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेकडून हे काम सुरू आहे. अभियांत्रिकी-विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंग कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. २३ मे ते १ जूनपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात काही ट्रेन रद्दही करण्यात येणार आहेत.
कोणत्या गाड्या रद्द
सीएसएमटी स्थानकाजवळ इंटरलॉकिंग कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान भायखळा ते सीएसएमटी उपनगरीय गाड्या बंद असणार आहेत. मेगाब्लॉकमुळे बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होणार असून बाहेरून येणाऱ्या काही गाड्या दादर स्टेशनपर्यंतच धावणार तर काही गाड्या दादरमधून सुटणार आहेत. मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस पनवलेपर्यंतच धावणार तर मुंबई-मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस पनवेलवरून सुटणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील परिणाम
सीएसएमटी ते भायखळा
मार्ग : अप स्लो, अप-डाऊन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १० -१८ दरम्यान सर्व मार्गिका
वेळ : रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत (रोज रात्री ४ तास)
- सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ कसारा ही शेवटची लोकल
- कल्याणहून रात्री १०.३४ सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल
- सीएसएमटीहून पहाटे ४.४७ कर्जत ही पहिली लोकल
- ठाण्याहून पहाटे ४ सीएसएमटी ही पहिली लोकल
- ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटी दरम्यान लोकल
२८ ते ३१ मेदरम्यान या मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द
सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या रद्द असणार आहेत.
दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस
लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस, होसा पेटे जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
पनवेलपर्यंत चालविण्यात येणारी एक्स्प्रेस
-१०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी
पनवेलहून सुटणारी एक्स्प्रेस
- २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या