लव्ह जिहाद! सोशल मीडियावर प्रसिद्धीचे आमिष दाखवून 'रिहान'ने केले अल्पवयीन मुलींचे शोषण

    23-May-2024
Total Views |
 love jihad
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात रिहान नावाच्या तरुणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना फसवल्याची घटना समोर आली आहे. रिहान मुलींना युट्युबवर प्रसिद्ध करण्यासाठी आमिष दाखवत असे. सोमवार, दि. २० मे २०२४ आरोपी अल्पवयीन मुलीसह फरार झाला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर पीडितेच्या वडिलांनी हिंदू संघटनेच्या सदस्यांची भेट घेतली आणि पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केला.
 
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार, तक्रारीत रिहानचे इतर काही सहकारीही या कटात सहभागी असल्याचे म्हटले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांचा दबाव वाढताच आरोपीने पीडितेला मेरठमध्ये सोडून पळ काढला. हे प्रकरण मेरठमधील मेडिकल कॉलेज पोलिस स्टेशन परिसरातील आहे. येथे दि. २० मे २०२४रोजी पीडितेच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
  
तक्रारीत त्यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांची १३ वर्षांची मुलगी काही वस्तू घेण्यासाठी दुकानात गेली होती. वाटेत तिला मेरठच्या तारापुरी भागातील रहिवासी असलेल्या रिहान भेटला आणि तो तिला सोबत घेऊन फरार झाला. या कटात आणखी ३ लोक सामील असल्याचंही पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. हे सर्वजण रिहानचे मित्र आहेत. आपल्या मुलीसोबत काही अनुचित प्रकार घडण्याची भीती फिर्यादीने व्यक्त केली आहे.
  
रिहान आणि त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम ३६३ अन्वये एफआयआर नोंदवला असून रिहान आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये रिहानचे नाव झीशान असे सांगितले जात आहे. या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, झीशान हिंदू मुलींना टार्गेट करतो आणि त्यांना आपल्या प्रेमात अडकवतो. तो या मुलींना युट्युबवर प्रसिद्ध करण्यासाठी आमिष दाखवत असे. सध्या अनेक हिंदू मुली त्याच्या तावडीत अडकल्या आहेत. झीशान उर्फ रिहानचे अनेक मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ देखील आहेत.