बनावट मतदान करणाऱ्यांना तिघांना अटक, त्यांच्या सुटकेसाठी कट्टरपंथींनी केला पोलीस स्टेशनवर हल्ला!

    22-May-2024
Total Views |
darbhanga jale police station attacked

नवी दिल्ली
: बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघात दि. २० मे २०२४ रोजी मतदान झाले. त्यावेळी जाले येथे चार जणांना बनावट मतदान करताना पकडले गेले. त्याच रात्री दीडशे लोकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला करून या चौघांची सुटका केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.जाले हा बिहारमधील दरभंगा जिल्ह्याचा एक भाग आहे, परंतु तो मधुबनी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जाले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हक्कनिया मदरसा देवरा बंधौली या मतदान केंद्रावर ४ जणांना बनावट मतदान करताना पकडण्यात आले. या चौघांना जाले पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले होते, त्यावेळी सायंकाळी १३०-१४० जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि बनावट मतदान करताना पकडलेल्या चौघांची सुटका केली.

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर ऑफिसर निर्भय कुमार यांनी दि. २० मे रोजी मतदानादरम्यान गस्त घालत असताना ४ लोकांना पकडले आणि त्यांना पोलीस कोठडीत बंद केले. याप्रकरणी जाले पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०३\२४ दाखल करण्यात आला. या प्रकरणी मोहम्मद सनाउल्लाह परवेज आलम, सादिया शेख, सालेहा फातिमा, जीनत परवीन यांना अटक करण्यात आली.दरम्यान सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक शेखर झा यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले, 'धक्कादायक, मोहम्मद सनाउल्लाह आणि ३ मुस्लिम महिलांना दरभंगा बिहारमधील हक्कानिया मदरसा मतदान केंद्रातून अटक करण्यात आली. का? कारण ते बुरखा घालून बनावट मतदान करत होते. यानंतर १०० ते १५० मुस्लिमांच्या जमावाने रात्री जाले पोलिस ठाण्यावर हल्ला करून सर्व आरोपींची पोलिस ठाण्यातून सुटका केली.




दरभंगा पोलिसांनीही याबाबतची माहिती दिली असून पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचे मान्य केले आहे. दरभंगा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दरभंगा पोलिसांनी जाले पोलिस स्टेशनच्या प्रमुखांच्या जबाबावरून १३०-१४० लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दरभंगा पोलिसांनी कलम १४७/१४८/१४९/३२३/३२४/२२५/३५३/३५४ (बी)/५०४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी दरभंगा एसपीच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असून, त्यांच्याकडून छापे टाकण्यात येत आहेत.दरभंगाचे एसएसपी जगुनाथ रेड्डी यांनी या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की या प्रकरणात २४ जणांची नावे आहेत आणि १३० अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणाचा तपास आता दरभंगाचे एसपी यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी करत आहे.