'बाहुबली'ची खास वेब सीरिज पाहिली का?

    22-May-2024
Total Views |
दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या 'बाहुबली'च्या जगतातील अॅनिमेटेड वेब सीरीज प्रदर्शित
 

bahubali  
 
मुंबई : लहान मुलांना परीक्षेच्या पेपरमधील प्रश्न जितके कठीण वाटले नव्हते तितके ‘कट्टपाने बाहुबली को क्यु मारा?’ या प्रश्नाने भंडावून सोडलं होतं. चित्रपटसृष्टीतील अनेक आयकॉनिक चित्रपटांपैकी एक म्हणजे एस.एस. राजामौली यांचा ‘बाहुबली’ हा चित्रपट. सर्वसामान्यत: चित्रपट हे मुळात लार्जर दॅन लाईफ असं माध्यम आहे. त्यातही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना कल्पनेच्या बाहेरील मोठं जग दाखवलं. आणि एस.एस राजामौली यांच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी तर अनोखं पौराणिक जग समोर आणलं. विशेष म्हणजे बाहुबली हा तमिळ चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला ज्याने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा टप्पा पार केला. पण तुम्हाला माहित आहे का राजामौली यांचा या दोन्ही ‘बाहुबलीं’च्या आधी आणखी एक कलाकृती आहे?
 
bahubali  
 
‘बाहुबली’ या चित्रपटाचे दोन्ही भाग ‘पुराणकथेचा आधुनिक अवतार’ ठरावेत असे आहेत. दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग असून त्याच चाहत्यांसाठी त्यांनी 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' (Bahubali Crown Of Blood) ही अॅनिमेटेड सीरिज आणली आहे. बाहुबली, भल्लाळदेव, शिवगामी, कट्टपा आणि माहिष्मती राज्यात घडणारं राजकारण हे सारं काही आपण ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये पाहिले आहे. पण त्यापुर्वी माहिष्मती राज्यात काय घडले असेल.. याचा शोध 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' या डिस्नी प्लस हॉटस्टार ओटीटी वाहिनीवर १७ मे रोजी प्रदर्शित झालेल्या सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. नऊ भागांची ही वेब सीरीज चित्रपटापूर्वी घडलेल्या घटनांचा शोध घेते. यात बाहुबली आणि भल्लालदेव शत्रूंचा सामना करण्यासाठी एकत्र येतात. येथे, रक्तदेव नावाच्या एका नवीन खलनायकाशीही देखील ओळख करुन देण्यात आली आहे. शरद देवराजान आणि राजामौली यांनी या सीरीजचे क्रिएशन केले असून ही सीरीज सध्या डिज्नी प्लस हॉटस्टारवरवरील टॉप १० इंडिया ट्रेंडमध्ये ही सीरिज पहिल्या स्थानी आहे.