द ग्रेट इंडियन वॉलेट’ अभ्यासात लोकांमध्ये वित्तीय कल्याणाबद्दल आत्मविश्वास वाढला

दोन तृतीयांश ग्राहक आर्थिक बचत करण्याचा आणि गुंतवणूक करण्याचा दावा करतात

    22-May-2024
Total Views |

info
 
 
 
मुंबई: होम क्रेडिट इंडिया (एचसीआयएन) ही जागतिक कन्झ्युमर फायनान्स प्रदात्याची स्थानिक शाखा आहे. त्यांनी द ग्रेट इंडियन वॉलेट स्टडीः मुख्य आर्थिक बाबींबद्दल ग्राहकांचे वर्तन – हे त्यांचे इन-हाऊस वार्षिक ग्राहक सर्वेक्षण प्रकाशित केले.
दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, लखनऊ, जयपूर, भोपाळ, पटना, रांची, चंदीगड, देहरादून, लुधियाना आणि कोचीसह १७ शहरांमध्ये ग्रेट इंडियन वॉलेट सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासात १८ ते ५५ वर्षे वयोगटातील अंदाजे २५०० लोकांना नमुना म्हणून समाविष्ट करण्यात आले. यामध्ये सहभागी लोकांचे वार्षिक उत्त्पन्न २ लाख ते ५ लाख रुपये होते.
 
या अभ्यासाबद्दल बोलताना होम क्रेडिट इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी आशिष तिवारी म्हणाले, 'द ग्रेट इंडियन वॉलेट स्टडी हा आमचा कंपास म्हणून काम करतो आणि ग्राहकांच्या आर्थिक वर्तनाच्या गुंतागुंतीच्या लँडस्केपमधून आम्हाला दरवर्षी मार्गदर्शन करतो. या अभ्यासातून आम्ही मूलभूत वर्तणुकीच्या ट्रेंडचा शोध घेऊ शकतो. तसेच त्याद्वारे आम्ही घरगुती आर्थिक स्थिरता आणि आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाशी संबंधित संभाव्य जोखमींबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त करतो. या वर्षीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की मजबूत आर्थिक वाढीमुळे शहरी आणि निमशहरी ग्राहकांमधील एकूण आर्थिक सुस्थितीत वाढ झाली आहे. हा अभ्यास ग्राहकांच्या भावनांबद्दल, त्यांच्या खर्च करण्याच्या पद्धतींबद्दल आणि विविध डेमोग्राफिक्स आणि विभागांमधील बचतीच्या सवयी या सर्वांबद्दल स्पष्ट अंतर्दृष्टी प्रदान करते.'
 
द ग्रेट इंडियन वॉलेट स्टडीनुसार, शहरी आणि निमशहरी ग्राहकांमधील वित्तीय कल्याण निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. ही वाढ सद्यस्थिती आणि भविष्यातील धारणा या दोन्ही बाबतीत झाली आहे. ५२% ग्राहकांनी सांगितले की त्यांचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात वाढले आहे, तर ७४% ग्राहक पुढील वर्षी त्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा करत आहेत. दोन तृतीयांश लोक असा दावा करतात की ते पुढील वर्षी अधिक (६६%) वाचवू शकतील आणि अधिक (६६%) गुंतवणूक करू शकतील. ग्राहकांच्या भावनांमधील ही उत्तेजन अर्थव्यवस्थेतील होत असलेल्या वाढीमुळे, कमाईच्या क्षमतेत झालेल्या वृध्दीमुळे आणि उत्पन्नाच्या वाढीची सकारात्मक धारणा यामुळे होत आहे.
 
क्षेत्रानुसार बोलायचे झाल्यास मुंबईतील सरासरी वैयक्तिक मासिक उत्पन्न वाढले आहे. गेल्या वर्षी ते ३२०००रुपये होते. त्या तुलनेत या वर्षी वैयक्तिक मासिक उत्पन्न ३३००० रुपये झाले आहे. अशा प्रकारे ते किंचित वाढले आहे. असे असूनही, निश्चित मासिक खर्च २०००० रुपये असे स्थिर आहे. त्यात कोणताच बदल झालेला दिसून येत नाही. विशेष म्हणजे यावर्षी, ५८% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की आपला मासिक खर्च केल्यानंतर ते काही रक्कम बचत करू शकले. आवश्यक मासिक खर्चामध्ये किराणा सामानावर २७% खर्च होतो. हा खर्च सर्वात अधिक आहे. त्यानंतर घराचे भाडे येते. यावर २०% खर्च होतो.
 
मग प्रवासावर २१%, मुलांच्या शिक्षणावर १२%, वैद्यकीय खर्चावर ८%, वीज ६%, स्वयंपाकाचा गॅस ४% आणि मोबाइल खर्च २% आहे. याउलट, विवेकाधीन खर्चाच्या बाबतीत बोलयाचे झाल्यास, मुंबईतील स्थानिक लोक ओटीटी अॅप्सच्या तुलनेत स्थानिक प्रवास आणि पर्यटन, जेवण, चित्रपट, फिटनेस यावर खर्च करतात. ते ओटीटी अॅप्सवर केवळ १% खर्च करतात तर प्रवास आणि पर्यटनावर २९%, बाहेर जेवणावर २१%, चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्यावर १२% आणि फिटनेसवर ४% खर्च करतात. अशा प्रकारे इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईकर ओटीटीसारख्या प्रकारांवर खूप कमी खर्च करतात.
 
गेल्या सहा महिन्यांत ५१% लोकांनी कपडे आणि ॲक्सेसरीजवर, २६% लोकांनी बाहेरील प्रवासावर, २५% लोकांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आणि 1% लोकांनी घरगुती सजावट आणि उपकरणांवर खर्च केले आहेत. आर्थिक फसवणूक ही चिंतेची बाब आहे, ७०% लोकांनी ऑनलाइन आर्थिक फसवणूक बघितली आहे, २०% लोक अशा घोटाळ्यांना बळी पडले आहेत आणि ५७% लोकांना आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने फसवणूक कॉल किंवा संदेश प्राप्त झाले आहेत. पुढे पाहता, नवीन वित्तीय सेवांमध्ये लक्षणीय स्वारस्य दिसून आले आहे. ५२% लोकांनी 'यूपीआयवर क्रेडिट' आणि ३०% लोकांनी UPI Lite (यूपीआय लाइट)मध्ये स्वारस्य दाखवले आहे. पण ६६% लोकांनी म्हटले की जर यूपीआय सेवेवर शुल्क आकारले गेले तर ते यूपीआय सेवा वापरणे बंद करतील.
 
दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर, अभ्यासात असे दिसून आले आहे की २०२४ मध्ये वैयक्तिक मासिक उत्पन्नाची सरासरी महानगरांसाठी ३५ हजार रुपये आहे आणि टियर १ आणि टियर २ शहरांसाठी ३२००० रुपये आहे. ती २२०३ मध्ये महानगरांसाठी ३३००० रुपये होती तर टियर १ शहरांसाठी ३०००० रुपये आणि टियर २ शहरांसाठी २७००० रुपये होती. अशा प्रकारे त्यात वाढ दिसून येते. महानगरे आणि टियर १ शहरांमध्ये बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे ही प्रमुख केंद्रे म्हणून उदयास आली आहेत आणि ज्या ग्राहकांना प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी नवीन आणि चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. या शहरांमध्ये उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा बंगळुरू आणि हैदराबादमध्ये उत्त्पन्न अनुक्रमे १५% आणि ३३% ने जास्त वाढले आहे.
 
या अभ्यासात २०२४ मध्ये निम्न-मध्यमवर्गीय व्यक्तींमधील उत्पन्न आणि खर्चाचा आढावा देखील देण्यात आला आहे. सरासरी,२०२४ मध्ये निम्न-मध्यमवर्गीय व्यक्तींचे वैयक्तिक मासिक उत्पन्न सुमारे 33 हजार रुपये आहे तर मासिक खर्च १९००० रुपये आहे. गेल्या वर्षी उत्पन्नात झालेली वाढ आणि खर्चात झालेली वाढ समान गतीने राहिली आहे.वॉलेट शेअरच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, अभ्यासात असे दिसून आले आहे की सरासरी निम्न-मध्यमवर्गीय भारतीय किराणावर २६% खर्च करतो आणि घरभाड्यावर २१% खर्च करतो. वॉलेट शेअरमधले हे त्यांचे प्राथमिक खर्च आहेत. त्यानंतर प्रवास खर्च जो १९% आहे, मुलांचे शिक्षण (१५%), वैद्यकीय खर्च (७%), वीज बिले (६%), स्वयंपाकाचा गॅस (४%) आणि मोबाइल बिले (२%) यांचा क्रमांक लागतो.
 
विवेकाधीन खर्चाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, वेगवेगळ्या प्रकरच्या लोकांमध्ये वेगवेगळे विशिष्ट प्रकारे खर्च करण्याच्या पध्दती दिसून येतात. इतर महानगरांच्या तुलनेत काही बाबतीत चेन्नई आघाडीवर आहे. जसे स्थानिक प्रवास/पर्यटनावर ते ५९% खर्च करतात, बाहेर खाण्यावर ५४% आणि चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यावर ५५% खर्च करतात. दुसरीकडे, लखनऊ स्थानिक प्रवास/पर्यटन आणि बाहेर खाण्यावर सर्वात कमी खर्च करणारे शहर आहे. तेथील निवासी स्थानिक प्रवास/पर्यटनावर केवळ १७% आणि बाहेर खाण्यावर १४% खर्च करतात. चेन्नईकरांना घर भाड्यावर सर्वात जास्त म्हणजे २९% खर्च करावा लागतो तर कोलकाता आणि जयपूरवासियांना घर भाड्यावर सर्वात कमी म्हणजे १५% खर्च करावा लागतो.
 
अहमदाबाद आणि डेहराडूनमध्ये राहणारे नागरिक फिटनेसवर सर्वात कमी खर्च करतात. हा खर्च केवळ १% आहे. बंगळुरू आणि कोची शहरात राहणारे लोक मुलांच्या शिक्षणावर सर्वात जास्त खर्च करतात. हा एकूण खर्चाचा २३% आहे. डेहराडून शहरवासी वैद्यकीय खर्चावर १३% खर्च करून सर्वात अव्वल ठरले आहेत परंतु मुलांच्या शिक्षणावर ते सर्वात कमी खर्च करतात. त्यांच्या एकूण खर्चाचा केवळ १०% भाग ते मुलामुलींच्या शिक्षणावर खर्च करतात.
 
या अभ्यासातून असे दिसून आले आहे की गेल्या सहा महिन्यांत, सुमारे ६०% लोकांनी कपडे आणि ॲक्सेसरीज यासारख्या फॅशन उत्पादनांची खरेदी केली होती. यामध्ये जेन झी (डिजिटल युगात म्हणजे 90च्या दशकाच्या शेवटी ज्याच्या जन्म झाला ती पिढी) यांनी फॅशन उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याकडे अधिक कल दर्शवलेला दिसून येतो.
 
घरगुती खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात सरासरी 6% वाढ झाली आहे. एकापेक्षा जास्त कमाई करणारे सदस्य असलेल्या कुटुंबांमध्ये, मुख्य वेतन मिळवणारा (चीफ वेज अर्नर/सीडब्ल्यूई) एकूण घरगुती खर्चाच्या ~८०% योगदान देतो, तर जी व्यक्ती मुख्य वेतन मिळवत नाही म्हणजेच जी नॉन-सीडब्ल्यूई आहे ती व्यक्ती एकूण घरगुती खर्चाच्या ~२०% योगदान देते. सर्वेक्षणात ४२% महिला त्यांच्या घरातील सीडब्ल्यूई आहेत.
 
बचतीच्याबाबतीत बोलायचे झाल्यास, ~६०% ग्राहकांनी म्हटले की त्यांच्या मासिक निश्चित खर्चासाठी पैसे काढल्यावर ते आपत्कालीन खर्चासाठी रोख राखीव रक्कम जमा करून ठेवण्याला प्राधान्य देतात. या अभ्यासानुसार, ६२% पुरुष आणि ५०% स्त्रिया बचत करतात. त्याचप्रमाणे, जेन झी मिलीनियल्स पिढी आणि जेन एक्स पिढीपेक्षा बचत करण्यावर अधिक भर देतांना दिसून येतात. ६८% जेन झी तर ६२% मिलीनियल्स (१९८१ ते 1९९६ दरम्यान ज्यांचा जन्म झाला ती पिढी) आणि ५३% जेन एक्स (६०च्या दशकात ज्यांचा जन्म झाला ती पिढी) बचत करतात असे दिसून आले. या अभ्यासात प्रादेशिकदृष्ट्या देखील विविधता दिसून आली आहे. पूर्वेकडील ग्राहक (६३%) पश्चिम भारत (६१%), दक्षिण भारत (५९%) आणि उत्तर भारताच्या (५९%) तुलनेत जास्त बचत दर दर्शवितात. याव्यतिरिक्त, महानगरांमध्ये बचतीचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. ६२% शहरी ग्राहक बचत करतात तर टियर 1 शहरांमधील 61% लोक आणि टियर २ शहरांमधील ५४% लोक बचत करतात.
 
या अभ्यासानुसार, ग्राहकांपैकी एक पंचमांश (२१%) आर्थिक फसवणूकीला बळी पडले आहेत. दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सर्वेक्षण केलेल्यांमध्ये पुरुषांना, जेन झी पिढीला आणि उत्तर भारतातील ग्राहकांना गेल्या काही महिन्यांत वारंवार फसवे कॉल आणि मेसेजेस प्राप्त झाले होते. अभ्यासात असेही दिसून आले आहे की १९% ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवर आपला आर्थिक डेटा स्टोअर करतात, तर २४% लोकांनी असा संवेदनशील डेटा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसह आणि कुटूंबासह शेअर केला आहे असे माहीत झाले. यातून असे दिसून येते की लोकांमध्ये डेटा सुरक्षिततेप्रति एक उदासीन दृष्टीकोन अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे, असे करण्यामध्ये महिला, जेन झी आणि दक्षिण भागातील रहिवासी अधिक शिथिल असल्याचे दिसून आले.
 
डिजिटल व्यवहाराच्या क्षेत्रात, यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) हा एक केंद्रबिंदू आहे. त्यात आर्थिक फसवणूकीचा धोका कमी करण्यासाठी अधिक दक्षता बाळगण्याची आणि सुरक्षा उपाय करण्याची अधिक गरज आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की ७२% लोक सध्या यूपीआयचे वापरकर्ते आहेत. याचा सर्वाधिक वापर पुरुष, जेन झी आणि महानगरात राहणारे रहिवासी करतात. विशेषतः यूपीआयचा वापर चेन्नईमध्ये सर्वाधिक (९०%) आणि अहमदाबादमध्ये सर्वात कमी (५८%) आहे.
 
पुढे अभ्यासात असे दिसून आले आहे की ४२% ग्राहकांनी, विशेषकरून पुरुष, जेन झी आणि टियर १ ग्राहकांनी यूपीआयवर क्रेडिट वापरण्यास स्वारस्य दाखवले. विशेष म्हणजे, 'यूपीआयवर क्रेडिट' का वापरता याची करणे विचारली असता ५३% लोकांनी सांगितले की कर्ज घेण्यास कमी कालावधी लागतो, ४४% लोकांनी सांगितले की किरकोळ स्टोअरमध्ये पेमेंट करायला सुलभ असते, २३% लोकांचे म्हणणे होते की चांगली ऑफर मिळण्याची शक्यता असते आणि १६% लोकांचे मत होते की यूपीआयवर कमी शुल्क आहे.'