मुंबई: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने एमडीएच व एव्हरेस्ट या मसाला कंपन्यांच्या कारखान्याची झडती घेण्यात आली. परंतु बहुतांश मसाल्याच्या नमुन्यात 'एथिलीन ऑक्साईड ' मिळाले नसल्याचे नियामक मंडळाने सांगितले आहे.
FSSAI ने आपल्या विज्ञान समितीमार्फत मसाल्यांचे २८ नमुने तपासले आहे. त्यामध्ये इथिलिन ऑक्साईडचे नमुने मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एव्हरेस्ट कंपनीच्या महाराष्ट्र व गुजरात येथील प्रकल्पाला भेट देत तपासले गेले तसेच एमडीएच कंपन्यांच्या दिल्ली, हरियाणा,राजस्थान येथील २५ नमुने तपासले गेले मात्र त्यातही इथिलीन ऑक्साइड मिळाले नसल्याचे यंत्रणेने सांगितले आहे. प्रयोगशाळेतील एकूण २८ नमुन्यांचे अहवाल आले आहेत व ६ नमुन्यांची तपासणी बाकी आहे.
इतर मसाला ब्रँडचे देशभरात ३०० नमुने देखील तपासले गेले आहे परंतु त्यातही इथिलीन ऑक्साइडचे प्रमाण मिळालेले नसल्याचे यात म्हटले गेले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नियामक मंडळाने म्हटले होते की 'जर खरच इथिलीन ऑक्साइडचे प्रमाण आढळल्यास त्या कंपन्याचे परवाने रद्द केले जातील.'
अन्न नियामक मंडळाने २२ मेला देशव्यापी मसाला कंपन्यांची चौकशी सुरू करत नमुने तपासण्यास सुरूवात केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय मसाला पदार्थांवर मोठा आक्षेप घेतला गेल्याने चौकशीला वेग आला होता. युएस, न्युझीलंड, सिंगापूर व अनेक राष्ट्रांनी भारतीय मसाल्यात इथिलिन ऑक्साईडसारखा घातक पदार्थ आल्याचे म्हटले होते. ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. यानंतर मोठ्या प्रमाणात या देशांनी भारतीय मसाला उत्पादनावर बंदी घातली होती.
चौकशीपूर्वी मसाला कंपन्यांनी इथिलिन ऑक्साईडचे दावे फेटाळले होते. यानंतर नियामक मंडळानी मोठ्या स्तरावर भारतीय मसाला उत्पादनांची चौकशी करण्याचे आदेश भारतीय अन्न नियामक मंडळाने आदेश दिले होते. आतापर्यंत देशभरात १५०० मसाला नमुने तपासण्यात आले आहेत असे अन्न नियामक मंडळाने सांगितले आहे.