मुंबई: काही महत्वाच्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. मुख्यतः मध्य आशियातील इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या निधनानंतर मध्यपूर्वेतील दबाव कायम दिसून येत आहे.तसेच आगामी १ जूनला ओपेक (OPEC) राष्ट्रांची बैठक होणार असून कच्च्या तेलाच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्यासाठी आणखी काही दिवस महागाई दर नियंत्रणात आल्यास होणार असल्याचे युएस कडून सुतोवाच मिळाल्याने बाजारात यांची दखल घेतली गेली.
युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने बैठकीतील मिनिटमधील माहिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच बाजारातील माहिती नुसार मध्यपूर्वेतील दबाव कायम असूनही मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात मोठी वाढ झाली आहे. बाजारातील क्रूड तेलाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे परिणामी बाजारात कच्च्या तेलाच्या दरात कपात झाली आहे.
बाजारातील WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८३ टक्क्यांनी घट होत ७८.०१ पातळीवर तेल पोहोचले आहे तर Brent निर्देशांकात ०.७८ टक्क्यांनी घसरण होत तेल ८२.२३ पातळीवर पोहोचले आहे तर भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.९३ टक्क्यांनी घसरण होत प्रति बॅरेल तेलाची किंमत ६५०७ रुपयांवर पोहोचली आहे. आता घसरण झाली तरी युएस फेड व्याज दर, डॉलरमध्ये होणारे बदल तसेच ओपेक राष्ट्रांच्या बैठकीतील निष्कर्ष यावर आगामी काळातील कच्च्या तेलाचे दर अवलंबून असतील.