पुणे अपघातप्रकरणी अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...
22-May-2024
Total Views | 53
पुणे : पुणे अपघातप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे. आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवेंनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्राद्वारे केली आहे.
पुण्यातील अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली. याशिवाय ही गाडी वितरित करणाऱ्यावाराही गुणही दाखल करण्यात यावा, अल्पवयीन मुलांना दारू उपलब्ध करून देणाऱ्या पब्जवर करावाई करण्याची मागणी मी…
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडले. वडिलांनीच आपल्याला कार दिली असून पार्टी करण्याची परवानगी दिल्याचे आरोपीने चौकशीत कबुल केले आहे. तसेच आपण मद्यप्राशन करत असल्याचे वडिलांना माहित असल्याचेही त्याने म्हटले आहे.
दरम्यान, विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. याशिवाय ही गाडी वितरित करणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा. अल्पवयीन मुलांना दारू उपलब्ध करून देणाऱ्या पब्जवर करावाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जर कोणी पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.