महिला शौचालयात कॅमेरा लावून रेकॉर्डिंग; काँग्रेस नेता 'आशिक बद्रुद्दीन'ला पोलिसांनी घेतले ताब्यात
21-May-2024
Total Views |
कोची : केरळमधील कोल्लममध्ये आशिक बद्रुद्दीन नावाच्या स्थानिक काँग्रेस युवा नेत्याला बाथरूममध्ये कॅमेरा ठेवून महिलांचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलांनी काँग्रेसचा युवा नेता आशिक बद्रुद्दीन यांच्याविरोधात थिनमला येथे शौचालय ऑपरेटर म्हणून काम करत असताना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आशिक बद्रुद्दीन हा पुनालूर ब्लॉकमधील युवक काँग्रेसचा सरचिटणीस आहे. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बद्रुद्दीनला अटक करून न्यायालयात हजर केले. तसेच पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिक (३०) हा थेनमळा धरण येथे टॉयलेट ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याने महिलांच्या स्वच्छतागृहात कॅमेरा बसवल्याचा आरोप आहे.
दि. २१ मे रोजी तिरुअनंतपुरमहून भेटायला आलेल्या काही मुलींना बाथरूममध्ये कॅमेरा आढळून आला आणि आशिक बद्रुद्दीनविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर आशिकला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.