Q4 Results: आयआरएफसीचा तिमाही निकाल ' रेल्वे कंपनी ' सुसाट कंपनीला १७१७.३ कोटी निव्वळ नफा ३.९२ टक्क्यांनी शेअर वधारला

संचालक मंडळाने ०.७० रुपया प्रति समभाग लाभांश सुचवला

    21-May-2024
Total Views |
IRFC  
 
 
मुंबई: रेल्वे कंपनी आयआरएफसी (IRFC) कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला गेला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३४ टक्क्यांनी वाढ झाली होती. मार्च २०२४ कंपनीला १७१७.३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तर मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला १२८५.२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
 
कंपनीच्या उत्पन्नात देखील ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीला ६४७७.९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी हे उत्पन्न ६२३०.२ कोटींवर होते. कंपनींच्या खर्चात मागील वर्षाच्या ४९४५ कोटी तुलनेत घट होत यावेळी ४७६०.६ कोटींवर खर्च पोहोचला आहे.
 
कंपनींच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये १.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी कंपनीचा महसूल ६१९३ कोटी होता त्यात वाढ होत या वर्षी महसूल ६४७३ व पोहोचला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर ०.७० रुपयांचे भांडवल सूचवले आहे. येणाऱ्या भागभांडवल धारकांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. आज आयआरफसी समभागात आज ३.९२ टक्क्यांनी वाढ होत समभाग १८०.०५ रुपयांवर पोहोचला आहे.