मुंबई: मध्य आशियातील काही घडामोडींमुळे व इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या मृत्यूमुळे बाजारातील क्रूड तेलाची हालचाल थंडावली आहे. तसेच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेचे उपाध्यक्ष फिलिप जेफरसन यांच्या नव्या विधानामुळे बाजारात क्रूड (कच्च्या) तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरण झाली आहे.
जेफरसन म्हणाले होते की महागाई दरात घट झाली तरी घट कधीपर्यंत राहिलं व व्याजदर कपातीत कधी होणार हे आतापासून सांगता येणार नाही. परिणामी बाजारातील निर्देशांकात घट झाली आहे.
WTI Future निर्देशांकात ०.६६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर ब्रेंट क्रूड निर्देशांकात ०.६५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात क्रूड तेलाच्या निर्देशांकात दुपारी १२ पर्यंत केवळ ०.०३ टक्क्यांनी वाढ झाली होती. भारतातील एमसीएक्सवर कच्च्या तेलाचे दर ६५८१ रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत.