यामी गौतम-आदित्य धार यांना पुत्ररत्न प्राप्त! बाळाचे ठेवले ‘हे’ नाव

    20-May-2024
Total Views |
yami  
 
 
मुंबई : अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धार आई-वडिल झाले आहेत. १० मे अक्षय्य तृतीयेच्या शुभमहुर्तावर यामीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यामीने सोशल मिडियावरुन ही आनंदाची बातमी शेअर करत नव्या चिमुकल्याचे नाव काय ठेवले आहे याचाही खुलासा तिने या पोस्टमध्ये केला आहे.
 
यामी आणि आदित्य दोघेही धार्मिक आहेत. आपल्या संस्कृतीशी त्यांची नाळ जोडली आहे याचा प्रत्यय बऱ्याचदा येत असतो. आणि त्याचेच प्रतिक म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'वेदविद्' (Vedavid) असे ठेवले आहे. 'वेदविद्' हा मूळ संस्कृत शब्द असून वेदांमध्ये पारंगत असलेला असा या नावाचा अर्थ आहे.
 
दरम्यान, यामीने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “डॉक्टरांच्या टीमचे खूप खूप आभार ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आमच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. मुलाच्या उज्वल भविष्यासाठी पालक म्हणून आमचा नवीन प्रवास सुरु झाला आहे. तो भविष्यात जे काही करेल ते आमच्या कुटुंबाला आणि देशालाही अभिमान वाटावं असं असेल ही आशा आम्ही व्यक्त करतो.”
 

yami  
 
यामी गौतमच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास नुकतीच ती आदित्य धार निर्मित आर्टिकल ३७० चित्रपटात दिसली होती. याशिवाय गेल्या वर्षी तिचा ‘ओएमजी २’ देखील आला होता.