मुंबई : गौतमी पाटील कायम चर्चेत असते. पण सध्या ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या नृत्याच्या बऱ्याच व्हिडिओमुळे ती अडचणीत येत असते. आता पुन्हा एकदा त्याच कारमामुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमीने तिच्या नव्या ‘आलं बाई दाजी माझं’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला असून अनेक मुलींसोबत तीदेखील पारंपरिक मराठी पोशाखात दिसत आहे. पण हे गाणं एका किल्ल्यामध्ये चित्रित झाले असल्यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहेत.
गौतमीने शेअर केलेल्या व्हिडीओत किल्ल्याचा एक भाग दिसत असून, हा व्हिडीओ पाहिल्यावर युजर्सनी कमेंट करून संताप व्यक्त केला आहे. ‘छान अशीच वाढवा आमच्या गडकिल्ल्यांची शोभा’, ‘शिवाजी महाराजांची थोडीशी तरी इज्जत ठेवा’, ‘मला माहित आहे तुम्ही जे करता ती तुमची कला आहे, पण गड किल्ल्यांवर असे डान्स शूट करू नका मॅडम,’ ‘ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाही…हे गडकिल्ले महाराजाची आणि महाराष्ट्राची शान आहे समजलं का?’ ‘गड किल्ल्यांवर अशी गाणी करणे अयोग्य आहे. दुसरी ठिकाणं मिळाली नाही का?’ अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.
तर काही जणं लिहितात, गडकिल्ल्यांवर खपवून घेतली जाणार नाही अश्लीलता’, ‘गडकिल्ल्यावर कधी बाई नाचली नाही तुमचा हा नाच्या कार्यक्रम पायथ्याशी दाखवा’, ‘जगाच्या इतिहासातील एकमेव असा राजा ज्याच्या दरबारात कधीही कुठली स्त्री नाचली नाही ते म्हणजे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज… ज्या गड-किल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले त्या गड-किल्ल्यांवरती जाऊन तुम्ही असले चाळे करतायेत लाजा वाटू द्या हे गड किल्ले महाराष्ट्राची शान आहेत,’ ‘गड संवर्धनाचं काही काम असेल किल्ल्यासाठी तर पुढे न येणार पुढे राहतात कोण? तो प्रोडूसर कोण आहे तो निर्माता त्याला अक्कल आहे का दलिंदर कुठले, गडकिल्ल्यावर बिलकुल असे तमाशा चालणार नाही किल्यावर,’ अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.
सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ जिथे चित्रित झाला आहे तो खरंच कोणता किल्ला आहे की सेट आहे हे मात्र अद्याप समजले नसले तरी किल्ला दिसत असून लोकं मात्र भयंकर चिडली आहेत.