मुकेश अंबानीसह सेलिब्रिटी उद्योगपतींनी मतदानाचा हक्क बजावला

सकाळपासून मतदानाचा उत्साह कायम !

    20-May-2024
Total Views |

Anil Ambani
 
 
मुंबई: निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना लोकसभा निवडणूकीचा पाचवा टप्पा पार पडताना दिसत आहे. आज अनेक सेलिब्रिटींनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे.उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे. याशिवाय आरबीआयचे गवर्नर शक्तिकांता दास यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी ७ वाजता मतदान केंद्र उघडली असून संध्याकाळी ६ पर्यंत नागरिक मतदानाचा हक्क बजावू शकतात.
 
आज ५ व्या टप्प्यात १४ लोकसभा उत्तर प्रदेश, १३ लोकसभा महाराष्ट्र, ७ पश्चिम बंगाल, ५ बिहार, ३ झारखंड, ५ ओडिशा, एक जम्मू काश्मीर आणि एक लडाख इतक्या जागांवर मतदान पार पडणार आहे. सकाळपासूनच उद्योगपती व सेलिब्रिटी व सामान्य व्यक्ती आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. अनेक जणांनी आपले मतदान हक्क बजावताना फोटो काढत हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी दुसऱ्यांना प्रोत्साहित केल्याचे चित्र उभे केले आहे.
 
शेवटच्या दोन टप्प्यांतील निवडणूका बाकी असून त्या अनुक्रमे २५ मे व १ जूनला होणार आहेत. याशिवाय टाटा समुहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.