मातृत्व हा एक परिवर्तनशील प्रवास आहे, जो स्त्रीच्या जीवनात आनंद, आव्हाने आणि गहन बदल आणतो. आनंदाचे क्षण आणि सुरुवातीच्या काळात, मातृत्वाच्या जगात कमी-चर्चेतील पैलू, विशेषतः मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या पैलूंना समजून घेणे आवश्यक आहे.
जागतिक उपासमारीचे संकट लाखो माता आणि त्यांच्या मुलांना उपासमार आणि गंभीर कुपोषणाकडे ढकलत आहे. उदाहरणार्थ, इथिओपियामध्ये तीव्र दुष्काळ, महागाई आणि वाढत्या अन्नाच्या किमतींशी टक्कर होऊन देशाचा अन्नपुरवठा कमालीचा कमी झाला, ज्यामुळे महिलांना त्यांचे पुढचे जेवण कोठे आणि कसे मिळवायचे, याबद्दल कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. अशक्तपणा... त्यांच्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी विनाशकारी परिणाम दाखवत आहेत. मुलींच्या आणि स्त्रियांच्या जीवनादरम्यान अपुर्या पोषणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, बौद्धिक विकास कमी होणे आणि गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणासह - त्यांच्या मुलांचे अस्तित्व, भविष्यासाठी धोकादायक होते. एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर एक अब्जाहून अधिक किशोरवयीन मुली आणि स्त्रिया कुपोषणाने ग्रस्त आहेत (कमी वजन आणि कमी उंचीसह), त्यांच्यात अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता आढळली आहे.
जागतिक स्तरावर, दोन वर्षांखालील ५१ दशलक्ष मुले ‘स्टंटिंग’ने ग्रस्त आहेत, याचा अर्थ कुपोषणामुळे तीच उंची, त्यांच्या वयाच्या तुलनेत खूपच कमी आहे. अहवालातील एका नवीन विश्लेषणानुसार, पहिल्या सहा महिन्यांत, मूल मातेच्या पोषणावर पूर्णपणे अवलंबून असते, तेव्हाच त्यांच्या वाढीत कमतरता निर्माण होत असते.जर बाळाचा जन्म पूर्ण कालावधीत झाला असेल, परंतु जन्माच्या वेळी त्यांचे वजन २,५०० ग्रॅमपेक्षा कमी असेल, तर त्यांना कुपोषित मानले जाते. या मुलांच्या त्वचा, स्नायू, हाडे, यकृत, मेंदू, मूत्रपिंड या सर्व अवयवांवर परिणाम होतो. गर्भधारणेच्या शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाच्या कुपोषणामुळे मुलाच्या मेंदूचा विकास मंदावतो, नंतर बाळ बहुतेक वेळा कमी हुशार होते. याव्यतिरिक्त, गर्भाचे कुपोषण बहुतेकदा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, चयापचय रोग, रक्त रोग आणि जन्मदोष यांसारख्या इतर जुनाट आजारांशी संबंधित असते. भारतातही ग्रामीण भागातील असुरक्षित मुलांसाठी कुपोषण ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासात विलंब होतो.
त्यासाठी पौष्टिक, सुरक्षित आणि परवडणार्या आहारात किशोरवयीन मुली आणि महिलांना प्राधान्य देणे, सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता आणि अशक्तपणा कमी करण्यात मदत करण्यासाठी पीठ, स्वयंपाकाचे तेल आणि मीठ यांसारख्या नियमितपणे खाल्ल्या जाणार्या खाद्यपदार्थांच्या मोठ्या प्रमाणावर पोषण मजबूत करण्यासाठी धोरणे आणि अनिवार्य कायदेशीर उपायांची अंमलबजावणी करणे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील किशोरवयीन मुली आणि महिलांना गर्भधारणेपूर्वी आणि दरम्यान, आणि स्तनपान करताना, जन्मपूर्व अनेक सूक्ष्म पोषक पूरक आहारांसह आवश्यक पोषण सेवांमध्ये विनामूल्य प्रवेश असल्याची खात्री करणे. या गोष्टीची पूर्तता सरकारने आपल्या हातात गंभीरपणे ठेवणे आवश्यक आहे.मातृत्व हा एक परिवर्तनशील प्रवास आहे, जो स्त्रीच्या जीवनात आनंद, आव्हाने आणि गहन बदल आणतो. आनंदाचे क्षण आणि सुरुवातीच्या काळात, मातृत्वाच्या जगात कमी-चर्चेतील पैलू, विशेषतः मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या पैलूंना समजून घेणे आवश्यक आहे.
मातेचे मानसिक आरोग्य ही केवळ एक वैयक्तिक चिंता नसून, मुलाच्या भावनिक, संज्ञानात्मक आणि सामाजिक विकासावर त्याचे दूरगामी परिणाम आहेत. संशोधनाने आईचे मानसिक आरोग्य आणि प्रतिसादात्मक काळजी प्रदान करण्याची तिची क्षमता यांच्यातील परस्पर संवाद स्थापित केला आहे. मानसिक आजार असलेल्या स्त्रिया ज्या माता आहेत, त्यांच्या आयुष्यात मातृत्वाच्या काळात होणारी गुंतागुंत मुलांचेही आयुष्य गंभीररित्या धोक्यात आणू शकते. अनेक मातांचे कौटुंबिक आयुष्य विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक मातांना घटस्फोटाचा अनुभव आला आहे.मातृ उदासीनता माता आणि मुले या नात्याच्या बंधनाशीही तितकीच संबंधित आहे. असुरक्षित नाते, झोपेचा त्रास, सामाजिक-भावनिक आणि बौद्धिक विकासामध्ये विलंब, वागणुकीत आक्रमकता, आचरण समस्या आणि ‘एडीएचडी’सारख्या बाह्य समस्या, विभक्त होण्याची चिंता, एकाकीपणाची समस्या आणि नैराश्य यांसारख्या समस्या आणि आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीत वाढ होण्याचा व व्यसनाधीनतेचा धोका मुलांमध्ये वाढतो.
गरीब सामाजिक-आर्थिक स्थिती, आईची कमी शैक्षणिक पातळी, एकल पालक कुटुंबे, मुलाचे लहान वय, आईच्या नैराश्याच्या लक्षणांची तीव्रता, आईमध्ये इतर मानसिक आरोग्य समस्या आणि या गोष्टींशी मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या संबंधित आहेत. आईचे त्वरित मानसिक उपचार, उच्च दर्जाचे बालसंगोपन आणि मुलांवरील नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आवश्यक आहेत.जेव्हाही माता म्हणून तुम्हाला निराश वाटेल, तेव्हा फक्त लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवातीपासून बनवलेल्या लहान जीवांसाठी या विश्वाचे एक जबाबदार केंद्र आहात. आपण एक प्रकारची महान शक्ती आहात. मातृत्व ज्याप्रकारे मातेला परत घडविते, अधिक मजबूत करते, शहाणे करते, अधिक दयाळू बनवते, सक्षम करते. माता म्हणून आपल्या स्वहितासाठी वेळ काढल्याने अपराधीपणाचा परिणाम होऊ नये, जे बर्याचदा मातांच्या बाबतीत होते. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता आणि तुमच्या गरजा पूर्ण करता, तेव्हाच तुम्ही इतर सर्वांची, तुमची मुले, तुमचा पती आणि तुमचे काम या सगळ्याची काळजी घेऊ शकता. मातांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जर त्यांनी प्रथम स्वतःला प्रेम आणि काळजी दिली नाही, तर त्या इतरांची काळजी घेऊ शकत नाहीत. म्हणूनच तमाम मातांना संदेश द्यावासा वाटतो की, ’Be proud of yourself for winning silent battles no one ever knew'
डॉ. शुभांगी पारकर