कलाकार आणि त्यांची मुलं कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे त्यांची नेमकी खरी नावं आणि त्यांचा उच्चार काय आहे.
मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांनी मुलगी ईशा देओल (Esha Deol) हिने आपली ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली. काही दिवसांपुर्वी ती तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चेत होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली असून यावेळी तिने तिच्या खऱ्या नावाचा उलगडा केला आहे. एका मुलाखतीत तिने आपल्या नावाचा योग्य उच्चार सांगितला आहे.
ईशाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती तिच्या नावाचा खरा उच्चार नेमका कसा आणि काय आहे याबाबत सांगताना दिसत आहे. या व्हिडिओत ती म्हणते, "आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय. ईशा नाहीतर एशा देओल माझं नाव आहे. हा संस्कृत शब्द आहे".
एशा देओलने आजवर, 'कोई मेरे दिल से पुछे', 'धूम', 'ना तुम जानो ना हम', 'युवा', 'आँखे', 'राज ३', 'LOC कारगिल' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. पण सध्या ती चित्रपटसृष्टीपासून जरा दोन हात लांबच आहे.