मुंबई: अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेड (AESL) कंपनीने Essar Transco Ltd कंपनीचे १९०० कोटींना अधिग्रहण केले आहे. मंगळवारी याविषयी अदानी समुहाने माहिती दिली असुन सर्व प्रकिया पार पाडत हे अधिग्रहण केले आहे. जून २०२२ मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार झाला होता. त्याचा अंतिम टप्पा म्हणून कंपनीने हे अधिग्रहण केले आहे.
४०० के वी ,६७३ किलोमीटर क्षमतेचे दोन राज्यांना जोडलेला हा प्रकल्प आहे. महान मध्यप्रदेश ते सिपत पूलिंग सब स्टेशन छत्तीसगड या दोन्हींना जोडणारा हा मोठा प्रकल्प सुरू झालेला आहे. अदानी ट्रान्समिशन स्टेप टू लिमिटेड (ATSTL) ही अदानी समुहाची उपकंपनी आहे या कंपनीने हे अधिग्रहण पूर्ण केले आहे.आता Essar अदानी समुहाची उपकंपनी असणार आहे.
अदानी समुहाने या क्षेत्रातील संधी वाढवण्यासाठी व कंपनीच्या वाढीसाठी हा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.