वेदांता समुह भारतात पुढील ४ वर्षात ' इतक्या ' अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार!

एका कार्यक्रमात बोलताना केले हे विधान

    01-May-2024
Total Views |

Anil Agrawal
 
 
मुंबई: वेदांता समुह पुढील ४ वर्षात २० अब्ज डॉलर्स रुपयांची गुंतवणूक करणार असे विधान वेंदांताचे सर्वेसर्वा व चेअरमन अनिल अग्रवाल यांनी केले आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक, ग्लास व्यवसायासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अग्रवाल बिहार राज्याचे असल्याने प्रामुख्याने त्यांना आपल्या राज्यात मोठा विकास व्हावा ही इच्छा आहे. परंतु त्यांच्या मते त्यांना व्यवसायिक धोरणांचा व मानसिक पाठबळ आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. हा खाणकाम क्षेत्रातील समुह आहे मुख्यतः त्यांना माईन व्यतिरीक्त इतर व्यवसायात विस्तार करण्याचे ठरवले आहे. एका समाजसेवी कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
 
या गटाला नंद घरांची एकूण संख्या खेड्यापाड्यांतील मुलांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करणाऱ्या एकूण नंद घरांची संख्या सध्याच्या ६००० वरून येत्या दोन वर्षांत २५००० पर्यंत नेण्याची इच्छा आहे, असे ते म्हणाले.