२८-१५-४-१! महायूतीचा फॉर्म्यूला निश्चित

    01-May-2024
Total Views |
 
Mahayuti
 
मुंबई : यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीमध्ये महायूती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांना सुरुवातही झाली आहे. अशातच महायूतीच्या जागावाटपाचा फॉर्म्यूला नुकताच समोर आला आहे.
 
हे वाचलंत का? -  पालघरच्या जागेबाबत बावनकुळेंचा खुलासा, म्हणाले...
 
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रासप अशा चार पक्षांच्या जागांचा हा फॉर्म्यूला आहे. २८-१५-४-१ असा महायूतीच्या जागावाटपाचा फॉर्म्यूला समोर आला आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजेच २८ जागा, शिवसेनेला १५ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि रासपला १ जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीचेही जागावाटप पूर्ण झाले असून मविआ आणि महायूतीच्या उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, यावेळी महायूती आणि मविआमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.