मुंबई, दि.३० : विमान कंपन्यांकडून ग्राहकांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या देताना त्यावर ऐच्छिक शुल्क आकारल्यास विमान तिकिटांचे दर आणखी कमी होऊ शकतात, अशी सूचना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कंपन्यांना केली आहे. डीजीसीएने विमान कंपन्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच, ग्राहकांचा प्रवास आनंदी आणि सुखकर होण्याच्यादृष्टीने काही सूचना जारी केल्या आहेत. सध्या विमानात चांगली जागा देण्यासाठी पैसे आकारले जातात, विमान प्रवासादरम्यान देण्यात येणारी खान-पान सेवा, लाऊंज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात, प्राधान्याने सामानाचे चेक-इन करण्यासाठी आकारण्यात येणारे पैसे, क्रीडा साहित्याचे वहन, संगीत वाद्यांचे वहन, नाजूक सामानाच्या हाताळणीसाठी अतिरिक्त पैसे आकारणे, असा या सात सेवा असून, त्यावरील पैशांची आकारणी ऐच्छिक करण्याची सूचना केली आहे. यामुळे विमान प्रवासाच्या किमती कमी होऊ शकतात, असे सुचित केले आहे.