_202405011501195910_H@@IGHT_524_W@@IDTH_698.jpg)
मुंबई: आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. दोन दिवसीय फेडची बैठक आज समाप्त होणार असून याविषयी जेरोम पॉवेल आपला फेडरल रिझर्व्ह व्याजदराचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये व्याजदरत बदल झाला का नाही झाला याबाबत कळेल परंतु त्याआधी रोजगार निर्मितीची अपेक्षित आकडेवारी अमेरिकेत आली नाही.व्याजदर घोषित करण्याच्या पूर्वसंध्येला बाजारात एक काळजीवाहू काळ सुरू झाल्याने बाजारात क्रूड तेलाच्या आंतरराष्ट्रीय मागणीत घट झाली आहे.
पुरवठा घटल्याबरोबरच मागणी घटल्याने क्रूड तेलाच्या किंमतीत आज घसरण झाली आहे. आज दुपारपर्यंत WTI Future निर्देशांकात १.२३ टक्क्यांनी व ब्रेंट क्रूड निर्देशांकात १.४१ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतीय एमसीएक्सवर (Multy Commodity Exchange) यावर संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.१३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.११ टक्क्यांनी वाढ झाली होती.तत्पूर्वी सोन्याच्या व चांदीच्या भावात घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात सोने व चांदी स्वस्त झाले आहे. भारतात सरासरी २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १००० रुपयांनी घट झाली आहे. तर २४ कॅरेट प्रति १० सोन्याच्या दरात १०९० रूपयांनी घट झाली आहे.
मुंबईतील सोन्याच्या २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम दरात १००० रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात १०९० रुपयांनी घट झाली आहे. चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे. मुंबईत चांदीचे १ किलो दर ५०० रुपयांनी घटले आहेत.