मुंबई: आज पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोने निर्देशांक एमसीएक्सवर ०.७८ टक्क्यांनी वाढत ७१४६५ पातळीवर पोहोचला आहे. एमसीएक्सवर चांदीच्या भावात ०.६९ टक्क्याने वाढ होत ८२४४० रुपयांपर्यंत चांदी पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रकारच्या सोन्याच्या १० ग्रॅम भावात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे.
मुंबईत सोन्याची किंमत देखील वधारली असून मुंबईतील सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम (१ तोळा) किंमत १०० रूपयांनी वाढत ६५८५० रूपयांवर पोहोचले.
२४ कॅरेट प्रकारच्या १० ग्रॅम सोन्याच्या दरात ११० रूपयांनी वाढ झाली आहे.१८ कॅरेट सोन्याच्या दरात ९० रुपयांनी वाढ होत ५३८०० रूपयांपर्यंत वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युएस फेडरल व्याजदर कपातीची शक्यता पुढे ढकलल्याने व जागतिक पातळीवर दबावामुळे जगातील सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड मध्ये ०.७६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.