लोकसभेकरिता दुसऱ्या टप्प्यात राज्यातून २०४ उमेदवार रिंगणात!
08-Apr-2024
Total Views |
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार रंगात येऊ लागला असताना, दुसऱ्या टप्प्यातील पाच मतदारसंघामधून २०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक ३७ उमेदवार अमरावतीत, तर सर्वात कमी १५ उमेदवारांनी अकोल्यातून अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरमध्ये दि. १९ एप्रिल रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात दि. २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे . दुसऱ्या टप्प्यासाठी ३५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १४८ जणांनी माघार घेतली.