‘सेक्रेड गेम्स’ची ऑफर आली पण अपमानामुळे सिद्धूने नाकारली; जाणून घ्या खास किस्सा...

    08-Apr-2024
Total Views |
अभिनेता सिद्धर्थ जाधव याचा आगामी सुस्साट... चित्रपट लवकरच भेटीला येणार असून यात त्याच्या सोबत प्रथमेश परब दिसणार आहे.
 

siddh  
 
मुंबई : शिवडी ते हिंदी चित्रपटसृष्टी असा प्रवास करणारा मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि विनोदाच्या टायमिंगमुळे चाहत्यांचा आवडता आहे. अगदी दिग्दर्शक रोहित शेट्टीलाही आपली दखल घ्यायला लावणाऱ्या सिद्धार्थ जाधवला चक्क ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games) या वेब सिरीजची ऑफर आली होती. याचा किस्सा सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत त्याने केला. प्रेक्षकांच्या पसंतीस आलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games) ही वेब सीरीज सिद्धार्थने अपमान झाल्यामुळे नाकारली होती.
 
सिद्धार्थ जाधव म्हणाला, "सेक्रेड गेम्ससाठी मी मुकेश छाब्रिया यांच्याकडे ऑडिशनला गेलो. मी सिलेक्टही झालो होतो. पण जेव्हा मानधनाबद्दल बोलणं सुरु होतं तेव्हा त्याने अगदीच कमी पैसे सांगितले. वर मला असं देखी म्हटल गेलं की इतर मराठी कलाकार तर करतात मग तुला काय अडचण आहे. पण तेव्हा मला वाटलं की नाही. असं नाही चालणार. पैसा म्हणजे सगळं नाही पण तुम्ही आदर द्या. तुमच्या कामामुळे तुम्हाला पुढचं काम मिळतं."
 
सिद्धार्थ पुढे म्हणाला, "ती भूमिका नक्कीच चांगली होती. पण नंतर ती सीरिजमधून काढण्यात आली. कारण ड्युरेशन खूप वाढलं. त्यामुळे एका अर्थी बरंच झालं. आणि मी कधीच त्या गोष्टीचा पश्चात्ताप केला नाही. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळतंच पण जे नशिबात नाही त्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न करा ते मिळणारच नाही."
 
दरम्यान, 'सेक्रेड गेम्स' ही अनुराग कश्यप दिग्दर्शित २०१८ साली आलेली वेब सीरिज होती ज्यात सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी राधिका आपटे, अमृता सुभाष, राजश्री देशपांडे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.