मुंबई: अर्थव्यवस्थेत सोमवारी निर्देशांकात वाढ झाल्याने भारतीय शेअर बाजार सकारात्मक दिसला होता. त्या अनुषंगाने बीएससी (BSE) वरील नोंदणीकृत असलेल्या कंपनीच्या बाजारी भांडवलात (मार्केट कॅपिटलयाझेशन) मध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. इक्विटी बाजारात मोठी रॅली झाल्याने तसेच समभागांच्या किमतीत वाढ झाल्याने बाजार उसळला होता.
बीएससी निर्देशांकात पहिल्यांदा बाजारी भांडवलाचा टप्पा ४०० ट्रिलियन रुपयांनी ओलांडला गेला आहे. बीएसीवरील बाजार भांडवलाची ३० समभागांची पातळी ४.८१ ट्रिलियनपर्यंत पोहोचली होती.
मागील आर्थिक वर्षात मार्केट कॅपिटलयाझेशन (बाजारी भांडवल) ३०० ट्रिलियनचा टप्पा पार केला गेला होता. सेन्सेक्स निर्देशांकात मारूती, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह,पॉवर ग्रीड,रिलायन्स इंडस्ट्रीज,एक्सिस बँक,जे एसडब्लू स्टील या समभागात (शेअर्स) मोठी वाढ झाली आहे. तर एकूण नुकसान विप्रो, नेसले, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स या समभागात नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,आशियाई बाजारात सीऊल, टोकियो बाजार सकारात्मक दिसले असून शांघाय, हाँगकाँग या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजारात नफा कायम राहिला होता.