बोट कंपनी ग्राहकांची माहिती लीक ! ७५ लाख लोकांची खाजगी माहिती धोक्यात

ShopifyGuy या हॅकर्संने खाजगी डेटा लीक केला

    08-Apr-2024
Total Views |

boat
 
 
 
 
 
 
 
मुंबई: डार्क वेबवर हॅकर्संने Boat कंपनीच्या ७५ लाख लोकांची खाजगी माहिती लीक केली आहे. नाव,पत्ता,फोन क्रमांक,इ मेल आयडी सगळी वैयक्तिक माहिती लीक करून डार्क वेबवर हॅकर्संने टाकली आहे. यामध्ये विशेषतः 'ShopifyGuy' या हॅकर्संने ही माहिती लिक केल्याची माहिती धोक्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
 
फोर्ब्सने दिलेल्या अहवालात माहितीची चोरी करणाऱ्या हॅकर्संचे नाव ' शॉपीफायगाय' (Shopifyguy) आहे. ५ एप्रिलला ही माहिती लीक झालेली आहे. लीक झालेल्या बोट (Boat) कंपनीच्या काही ग्राहकांनी या बातमीला दुजोरा देत माहिती लीक झाल्याचे म्हटले आहे.
 
यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. या लीकमधून संभाव्य आर्थिक घोटाळा, सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बोट कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्राहकांची प्राथमिकता ऑनलाईन खरेदीकरिता सुरक्षेला प्राथमिकता देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
बोट ही भारतीय कंपनी असून अमन गुप्ता व समीर मेहता यांनी २०१६ साली ही कंपनी स्थापन केली होती.थोडयाच काळातत या कंपनीने ऑडिओ वेरेबल उत्पादनात मोठी लोकप्रियता मिळवली होती. यावर कंपनीची अजून कुठलीही अधिक प्रतिक्रिया मिळालेली नाही.