उबाठाचे लोकसेभेचे उमेदवार अमोल कीर्तीकर ईडी कार्यालयात दाखल!

    08-Apr-2024
Total Views |

Amol Kirtikar 
 
मुंबई : उबाठा गटाचे नेते अमोल कीर्तीकर हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणाच्या चौकशीकरिता ते ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरु आहे. याशिवाय उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरदेखील खिचडी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. दरम्यान, अमोल कीर्तीकर यांना उबाठा गटाकडून मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप असून याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले आहेत. याशिवाय आता लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांची चौकशीही सुरु झाली आहे.
 
हे वाचलंत का? -  संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार : संजय निरुपम
 
दुसरीकडे, संजय निरुपम यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत खिचडी घोटाळ्यासंदर्भात संजय राऊतांची पोलखोल केली आहे. संजय राऊत हेच खिचडी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोना काळात सह्याद्री रिफ्रेशमेंट या कंपनीला ६ कोटी ३७ लाख रुपयांच्या खिचडीचा पुरवठा करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. या कंपनीकडून संजय राऊतांच्या परिवाराने आणि त्यांच्या मित्राने १ कोटी रुपये दलालीच्या स्वरुपात घेतले होते. याशिवाय परळ येथील वैष्य सहकारी बँकेतील खात्यातून राऊतांनी त्यांची मुलगी विदीता राऊत हिच्या नावाने चेकद्वारे लाच घेतली, असेही त्यांनी सांगितले.