'स्वातंत्र्यवीर सावरकर' या रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित चित्रपटाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.
नाशिक : नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते, अभिनेते रणदीप हुड्डा यांनी शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी भगूर येथील सावरकरांच्या स्मारकाला (Swatantryveer Savarkar) भेट दिली. यावेळी स्मारकात यांनी सावरकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. यावेळी रणदीप यांना भूषण कापसे यांनी संपूर्ण स्मारकाची माहिती दिली.
यावेळी बोलताना रणदीप हुड्डा म्हणाले की, "एक भावना, एक प्रेरणा स्वा. सावरकर यांना विनम्र अभिवादन करतो. मी धन्य आहे की, मला त्यांची भूमिका साकारण्याची आणि त्यांच्यावर चित्रपट बनवण्याची संधी मिळाली. या स्मारकाला भेट देऊन मी खूप भावुक झालो आहे. येथून जाताना मी एक अलौकिक शक्ती घेऊन जाणार आहे.
“सावरकरांबंदद्ल बोलण्यासाठीचा कलेजा बाबूजी आणि रणदीपकडे”, सुनील बर्वेंची खास पोस्ट
सुनील बर्वे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले आहे की, "वो कायर क्या जाने उन आसूओंकी कीमत जो वतन के लिए छलकते है!! अभिनंदन रणदीप हुडा, ह्या थोर स्वातंतत्र्यवीराचं चरित्र चित्रपटाच्या माध्यमामातून जगासमोर आणल्याबद्दल!! सावरकरांबद्दल इतक्या समर्पित भावनेनं चित्रपट करण्यासाठी कलेजा लागतो, जो फक्त आमच्या बाबूजी अर्थात स्वरगंधर्व सुधीर फडके आणि तुमच्याकडे आहे!! आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं चित्रपटगृहात प्रेक्षक गर्दी करीत आहेत हे पाहून खूप आनंद झाला!!".
दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २९ मार्च रोजी मराठीत देखील प्रदर्शित झाला. मराठीतील खास शोला मराठी कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती, ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावे, सुप्रिया पिळगांवकर, रवी जाधव, मुग्धा वैशंपायन, राहूल देशपांडे अशा अनेक मराठी कलाकारांनी चित्रपटाचे आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांचे कौतुक केले आहे.