वंचितला मोठा दणका! 'या' उमेदवाराला सोडावे लागणार मैदान

    06-Apr-2024
Total Views |
 
Prakash Ambedkar
 
पुणे : संपूर्ण राज्यात सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीला शिरुर लोकसभा मतदारसंघात मोठा दणका बसला आहे. वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.
 
हे वाचलंत का? -  प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघातली अवस्था दाखवणारा व्हिडिओ!
 
बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्याविरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने त्यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार ही उमेदवारी रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.