‘चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराने सुरू केला व्यवसाय, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले उद्धाटन

    06-Apr-2024
Total Views |
श्रेया बुगडे पाठोपाठ चला हवा येऊ द्या मधील आणखी एक कलाकार हॉटेल व्यवसायात आला आहे. 
 

deval  
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपल्यानंतर अनेक कलाकार वेगळ्या वाटेवर चालताना दिसले. यापैकी एक कलाकार म्हणजे तुषार देवल (Chala Hawa Yeu Dya) . गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी अभिनयासोबत व्यवसाय सुरु केले. यात आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात संगीत दिग्दर्शक ही जबाबदारी सांभाळणाऱ्या तुषार देवल (Chala Hawa Yeu Dya) याने स्वत:चे हॉटेल सुरु केले असून या हॉटेलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले.
 
अभिनेत्री स्वाती देवल आणि संगीत दिग्दर्शक तुषार देवल यांनी मिळून मिसळ महोत्सवात एक मिसळ स्टॉल सुरू केला होता. ज्याचे नाव 'चला मिसळ खाऊया' असे ठेवले होते. आता त्याचे हॉटेलमध्ये रुपांतर करत ‘देवल मिसळ’ असे नाव ठेवले आहे. बोरीवलीत सुरु झालेल्या 'देवल मिसळ' या शाखेचं उद्धाटन केंद्रीय मंत्री पीयूष जी गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. यासंदर्भात पोस्ट शेअर करताना त्यानं 'आज माझं अजून एक स्वप्नं पूर्ण झालं', अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
 
deval
 
तसेच, काही दिवसांपुर्वी अभिनेत्री श्रेया बुगडे हिने देखील ‘द बिग फिश कंपनी’ हे मांसाहारी हॉटेल दादरमध्ये सुरु केले. तर ‘चला हवा येऊ द्या’ मधील डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि स्नेहल शिदम यांनी कलर्स मराठीची वाट धरली असून हसताय ना? हसलंच पाहिजे हा नवा कार्यक्रम भेटीला घेऊन येण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.