सोने चांदी स्वस्त झाले ! सोने १ तोळ्याला ४९० रुपये कमी झाले

डॉलरच्या भावात उसळी आल्यानंतर सोने झाले स्वस्त

    05-Apr-2024
Total Views |

Gold
 
मुंबई: गुरूवारी सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाल्यानंतर मात्र सोने चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली आहे. शुक्रवारी डॉलरच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत नियंत्रित झालेल्या पाहिला मिळाल्या आहेत. दुपारी ३ पर्यंत एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात ०.७३ टक्क्याने घसरण होत निर्देशांक ६९६२८ पातळीवर पोहोचला आहे. तर चांदीचा एमसीएक्सवर (Multi Commodity Index) निर्देशांक ०.७७ टक्क्याने घटत ७९३६५ पातळीवर पोहोचला आहे.
 
भारतात सरासरी सोन्याचे दर प्रति ग्रॅम ४५ रूपयांनी घसरण झाली आहे. तर १० ग्रॅम (१ तोळा ) २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ४५० रुपयांनी घसरण होत किंमत ६४१५० रूपयावर पोहोचली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति ग्रॅम ४९ रुपयांनी घट होत ६९९८ रूपयावर पोहोचले आहे. तर १० ग्रॅम (१ तोळा) सोन्याच्या दरात ३६० रूपयांनी घसरण होत ५२४९० रुपयांवर दर पोहोचला आहे.
 
मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत ४५ रूपयांनी कमी झाली तर १० ग्रॅम (१ तोळा) किंमतीत ४५० रूपयांनी घसरण होत सोने ६४१५० रूपयांवर पोहोचले आहे.२४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम ४९ रुपयाने घट झाली आहे. तर १० ग्रॅम (१ तोळा) सोन्याच्या भावात ४९० रूपयाने घट होत ६९९८० रुपयावर सोने पोहोचले आहे.
 
मुंबईतील चांदीच्या किंमतीत प्रति ग्रॅम ०.३० रुपयाने घट झाली आहे. म्हणजेच १ किलो चांदीचा दर ३०० रूपयांनी कमी झाल आहे. गुंतवणूकदारांसाठी ही सोने चांदी खरेदीसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे.